Rare Deep-Sea Fish | समुद्राच्‍या २,३०० हजार फूट तळात अंधारात राहणाऱ्या दुर्मीळ माशाचे दर्शन 
विश्वसंचार

Rare Deep-Sea Fish | समुद्राच्‍या २,३०० हजार फूट तळात अंधारात राहणाऱ्या दुर्मीळ माशाचे दर्शन

पुढारी वृत्तसेवा

लंडन : अटलांटिक महासागराच्या गूढ अंधाऱ्या डोहात राहणाऱ्या एका अत्यंत दुर्मीळ माशाचे जिवंत आणि नैसर्गिक अधिवासातील पहिले चित्रीकरण करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, 'बॅरली फिश' प्रजातीचा ‘विंटेरिया टेलिस्कोपा’ नावाचा हा अद्भु‌त मासा 'श्मिट ओशन इन्स्टिट्यूट'च्या मोहिमेदरम्यान कॅमेऱ्यात कैद झाला.

अटलांटिक महासागरातील अत्यंत दुर्गम अशा 'डोलड्रम्स मेगॅट्रान्सफॉर्म अँड फ्रॅक्चर झोन'मध्ये सुमारे २,३०० फूट (७१० मीटर) खोलीवर हा मासा आढळून आला. या खोलीवर सूर्यप्रकाश नाममात्र पोहोचत असल्याने तिथे संपूर्ण अंधार असतो. या माशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे डोके पूर्णपणे पारदर्शक असते, त्‍यामुळे त्याच्या कवटीच्या आतील डोळे स्पष्ट दिसतात. इतर माशांप्रमाणे याचे डोळे बाजूला नसून नळीच्या आकाराचे (ट्यूब सारखे) आणि वरच्या दिशेला असतात.

हे वैशिष्ट्य त्याला वरील अंधूक प्रकाश आणि भक्ष्याने सोडलेला जैविक प्रकाश शोधण्यास मदत करते. या माशाचा आकार साधारणपणे ४ ते ६ इंच (केळाच्या आकाराएवढा) असतो. यापूर्वी जेव्हा जेव्हा हे मासे जाळ्यात पकडून वर आणले गेले, तेव्हा समुद्राच्या दाबातील बदलामुळे त्यांच्या डोक्याचे पारदर्शक कवच नष्ट होत असे. त्यामुळे शास्त्रज्ञांना कधीही त्यांच्या जिवंत हालचालींचा अभ्यास करता आला नव्हता. या मोहिमेत 'सुबास्टियन' या रोबोटिक वाहनाचा वापर करून हा ऐतिहासिक व्हिडीओ तयार करण्यात आला. या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांना महासागराच्या तळाशी दोन नवीन गरम पाण्याचे झरे आणि अत्यंत दुर्मीळ असा ‘बिगफिन स्क्विड’ देखील पाहायला मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT