King Cobra | लखीमपूरमध्ये दुर्मीळ ‘चंद्रनाग’चे दर्शन 
विश्वसंचार

King Cobra | लखीमपूरमध्ये दुर्मीळ ‘चंद्रनाग’चे दर्शन

पुढारी वृत्तसेवा

लखीमपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील तराई पट्ट्यात असलेल्या लखीमपूर जिल्ह्यातील पलियाकलां येथे ग्रामस्थांना अत्यंत दुर्मीळ प्रजातीच्या ‘चंद्रनाग’ सापाचे दर्शन झाले. केवळ अंधारात बाहेर पडणार्‍या या अत्यंत विषारी सापाला ग्रामस्थांनी ‘वन्यजीव सेवा मानव सेवा’ संस्थेच्या मदतीने पकडून सुरक्षितरीत्या जंगलात सोडून दिले.

सोमवारी पटिहन क्षेत्रातील खुशीपूर गावात हा दुर्मीळ साप दिसून आला. त्याच्या फण्यावर असलेल्या विशिष्ट खुणेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सापाची माहिती मिळताच ग्रामस्थांनी ‘वन्यजीव सेवा मानव सेवा’ संस्थेचे प्रभारी राम गोविंद यांना कळवले. राम गोविंद यांनी तत्काळ रेस्क्यू टीमसह गावात धाव घेतली आणि अरुण कुमार यांच्या घराजवळून या सापाला पकडले.

या सापाचे स्थानिक नाव ‘चंद्रनाग’ असून, वैज्ञानिक नाव ‘मूनकोलेड कोब्रा’ (Moon- collared Cobra) असे आहे. हा साप दुर्मीळ असून, तो सहसा खूप कमी वेळा दिसतो. हा अत्यंत विषारी असून, प्रामुख्याने रात्रीच्या अंधारातच बाहेर पडतो. कीटक हे त्याचे आवडते खाद्य आहे. पलिया क्षेत्रातील बसही आणि संपूर्णानगर भागात या प्रजातीचे साप अधिक प्रमाणात आढळतात. या यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT