अमेरिकेत डासांमुळे फैलावणारा मेंदूचा दुर्मीळ आजार Pudhari File Photo
विश्वसंचार

अमेरिकेत डासांमुळे फैलावणारा मेंदूचा दुर्मीळ आजार

दरवर्षी अमेरिकेत या आजाराच्या 30 ते 90 रुग्णांची नोंद

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : ‘ला क्रॉस’ विषाणूजन्य आजार हा एक दुर्मीळ व्हायरल आजार आहे जो डासांच्या चाव्यांमुळे माणसांना होतो. या आजाराचे नाव La Crosse County, Wisconsin येथून आले आहे, जिथे 1960 च्या दशकात डॉक्टरांनी प्रथम याचे निदान केले होते. दरवर्षी अमेरिकेत या आजाराच्या 30 ते 90 रुग्णांची नोंद होते. यातील सुमारे 60 टक्के रुग्ण पुरुष असतात आणि 90 टक्के रुग्ण 20 वर्षांखालील वयोगटातील असतात. रुग्णसंख्या वसंत ऋतूच्या उत्तरार्धापासून ते सुरुवातीच्या शरद ऋतूपर्यंत वाढते, कारण त्या काळात डासांची संख्या अधिक असते.

उत्तरेकडील मिडवेस्टर्न, मिड-अटलांटिक आणि दक्षिण-पूर्व अमेरिकेतील राज्यांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. अमेरिकेबाहेर या आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. ला क्रॉस आजाराचा मुख्य कारणीभूत La Crosse virus नावाचा विषाणू आहे. हा विषाणू edes triseriatus नावाच्या विशिष्ट डासांमार्फत पसरतो. हे डास मुख्यतः झाडांमध्ये असलेल्या फटींमध्ये अंडी घालतात आणि उघड्या जागी साचलेल्या पाण्यातही त्यांची पैदास होते. ज्यांना जंगलात किंवा झाडाझुडपांत वेळ घालवण्याची सवय आहे, अशा लोकांना या डासांच्या संपर्कात येण्याची शक्यता अधिक असते. एकदा माणसाच्या शरीरात गेल्यावर, हा विषाणू मेंदूपर्यंत पोहोचतो आणि तिथल्या न्यूरॉन्सना इजा करतो. हा आजार माणसातून माणसात पसरतो का? तर नाही. ला क्रॉस विषाणू फक्त डास चावल्यानेच पसरतो. माणसाच्या रक्तात हा विषाणू फार कमी प्रमाणात असतो, त्यामुळे दुसर्‍या डासाने चावल्यास त्यांच्यातून पुढे विषाणू पसरत नाही. म्हणूनच, माणसाला

"dead- end host’ असे म्हणतात म्हणजे एकदा माणसात विषाणू गेल्यावर तो दुसर्‍या कुणातही पोहोचत नाही. डासांना हा विषाणू सामान्यतः लहान सस्तन प्राण्यांमधून मिळतो, उदा. खार, चिपमंक्स इत्यादी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT