प्रथमच समुद्राच्या पृष्ठभागाजवळ दिसला ‘हा’ भयावह मासा. Pudhari File Photo
विश्वसंचार

प्रथमच समुद्राच्या पृष्ठभागाजवळ दिसला ‘हा’ भयावह मासा

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : समुद्राच्या तळाजवळ अनेक अनोखे जलचर वावरतात. पाण्याचा प्रचंड दाब, प्रकाशाची कमतरता अशा स्थितीत राहणारे हे जीव अतिशय वेगळेही असतात. आता अशाच एका माशाला चक्क समुद्राच्या पृष्ठभागाजवळ कॅमेर्‍यात टिपण्यात आले आहे. एरवी खोल समुद्रात राहणारा हा जीव, आता असा कॅमेर्‍यात टिपलेला आहे. त्याचे रूप अतिशय भयावह असल्याने त्याला सैतानाचीच उपमा देण्यात येत असते.

आफ्रिकेतील कॅनरी आयलंडच्या किनार्‍यानजीक हा जीव चित्रीत केला, जो सहसा कुठंही पाहायला मिळत नाही. समुद्राच्या खोलवर राहणार्‍या या माशाचे नाव ‘सी डेव्हील अँगलफिश’ असे आहे. तो इतक्या जवळून आणि तोसुद्धा किनार्‍याच्या इतक्या नजीक पाहण्याची ही पहिलीच वेळ. ‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या वृत्तानुसार सी डेव्हिल हा मासा सहसा समुद्राच्या पृष्ठापासून 650 ते 6500 फूट खोलवर आढळतो. तांत्रिक भाषेत या क्षेत्राला बॅथिपेलॅजिक झोन किंवा मिडनाईट झोन असं म्हटलं जातं. ‘नोवा’ च्या माहितीनुसार या क्षेत्रामधील तापमान साधारण 39 फॅरेनहाईट (4 अंश सेल्सिअस) इतकं असतं. समुद्रातील इतक्या खोलवरच्या क्षेत्रामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असण्यासोबतच पाण्याचा दाब 5850 पाऊंड प्रति इंच इतका असतो. संशोधकांनी या माशाविषयी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार समुद्री माशांची ही प्रजाती अतिशय दुर्मीळ आहे. समुद्राच्या जवळपास तळाशी असणारी ही अतिशय जुनी प्रजातीही असल्याचं म्हटलं जातं. व्हायरल होणार्‍या या व्हिडीओमध्ये हा मासा पाहायला मिळत आहे. जिथं समुद्राच्या तळाशी निळ्याशार पाण्यामध्ये काळसर रंगाचा आणि अतिशय विचित्र रचना असणारा एक मासा पाहायला मिळत आहे. या माशाचे तीक्ष्ण दात भयावह दिसतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT