Prohodna Cave | ‘या’ गुहेला आहेत दोन ‘डोळे’! 
विश्वसंचार

Prohodna Cave | ‘या’ गुहेला आहेत दोन ‘डोळे’!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : युरोपमधील बुल्गारिया देशाच्या उत्तरेकडील भागात एक अशी रहस्यमयी जागा आहे, जिने आपल्या कुशीत निसर्गाची अनेक गूढ रहस्ये दडवून ठेवली आहेत. बुल्गारियाची राजधानी सोफिया येथून ईशान्य दिशेला, लोवेच शहराजवळ असलेल्या या अत्यंत आकर्षक जागेला 'प्रोहोदना गुहा' म्हणून ओळखले जाते. या गुहेच्या छतावर हुबेहूब डोळ्यांसारखी दोन मोठी छिद्रे आहेत. त्यांना 'देवाचे डोळे' असे म्हटले जाते!

आपली अनोखी नैसर्गिक रचना आणि विलोभनीय सौंदर्यामुळे आज ही जागा बुल्गारियातील सर्वोत्तम १०० पर्यटन स्थळांच्या यादीत समाविष्ट झाली आहे. या गुहेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या छताला निसर्गतःच पडलेली दोन मोठी छिद्रे (विवरे). ही छिद्रे हुबेहूब माणसाच्या डोळ्यांसारखी दिसतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर आणि पर्यटकांमध्ये या गुहेला 'गॉडस्‌ आइज' (The Eyes of God) म्हणजेच 'देवाचे डोळे' असेही म्हटले जाते. गुहेत प्रवेश केल्यानंतर वर पाहताना जणू देवच आपल्याकडे पाहत असल्याचा भास होतो. हजारो वर्षांपूर्वी पाण्याच्या प्रवाहामुळे झालेल्या खडकांच्या झिजेतून ही गुहा तयार झाली आहे. पावसाळ्यात जेव्हा या डोळ्यांसारख्या दिसणाऱ्या छिद्रांमधून पाणी खाली पडते, तेव्हा जणू काही ते डोळे रडत आहेत असा निसर्गरम्य आणि थरारक अनुभव येतो. सध्या जगभरातील गिर्यारोहक, साहसी पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी ही प्रोहोदना गुहा आकर्षणाचे मुख्य केंद्र बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT