प्रिन्स विल्यम आणि केट यांनी घेतली प्रिन्सेस डायनाच्या गुप्त मुलीची भेट? 
विश्वसंचार

प्रिन्स विल्यम आणि केट यांनी घेतली प्रिन्सेस डायनाच्या गुप्त मुलीची भेट?

पुढारी वृत्तसेवा

लंडन : ब्रिटनच्या राजघराण्याबाबत पुन्हा एकदा चर्चेची लाट उठली आहे. प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन यांनी अलीकडेच प्रिन्सेस डायनाची ‘गुप्त मुलगी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका महिलेची भेट घेतल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये केला जात आहे.

या दाव्यानुसार, 1980 च्या दशकात डायनाच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान एका प्रयोगशाळेने तिच्या डीएनएचा वापर करून गुप्तरीत्या एक भ्रूण तयार केले होते. ते भ्रूण नंतर एका अन्य स्त्रीच्या गर्भाशयात प्रत्यारोपित करण्यात आले आणि त्यातून एका मुलीचा जन्म झाला. ही कथा बराच काळ गूढतेने झाकलेली होती; मात्र अलीकडे काही दस्तावेज आणि डिजिटल पुरावे समोर आल्याचा दावा केला जात आहे.

ब्रिटनच्या राजघराण्याने या दाव्यांवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही; परंतु काही सूत्रांनी सांगितले आहे की, प्रिन्स विल्यम आणि केट यांनी गोपनीयपणे या महिलेची भेट घेतली आणि ती भेट अत्यंत भावनिक ठरली. गुप्त मुलीच्या संदर्भात इतिहास अभ्यासक आणि राजघराण्याचे अभ्यासक यांच्यात मतभेद आहेत. काहींच्या मते, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आणि गॉसिपवर आधारित आहे, तर काहींचे म्हणणे आहे की, प्रिन्सेस डायनाच्या आयुष्याशी संबंधित अनेक तथ्ये अजूनही पूर्णपणे उघड झालेली नाहीत.

राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान असणार्‍या बकिंगहॅम पॅलेसने या विषयावर कोणतीही टिप्पणी अथवा प्रतिक्रिया दिलेली नाही. डायनाच्या गुप्त मुलीच्या या कथेला सध्या कोणतेही ठोस पुरावे नाहीत; परंतु सोशल मीडियावर आणि युरोपीय टॅब्लॉईडसमध्ये ही चर्चा वेगाने पसरत आहे. प्रिन्सेस डायनाबाबत लोकांची भावनिक जोड लक्षात घेता ही कथा अनेकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT