वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी 28 मार्चला सूर्याच्या पृष्ठभागावरून निघणारा अत्यंत शक्तिशाली एक्स-श्रेणी सौर ज्वालामुखी टिपला. या प्रचंड स्फोटानंतर दोन खंडांमध्ये मोठ्या प्रमाणात रेडिओ ब्लॅकआऊट झाला. GOES-16 उपग्रहाने, जो ‘नासा’ आणि नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन यांच्यातील संयुक्त प्रकल्प आहे, या सौर ज्वालामुखीचा व्हिडीओ कैद केला. हा ज्वालामुखी 28 मार्चलासूर्याच्या एका डागातून बाहेर पडताना दिसला.
ही X1.1- श्रेणीची सौर ज्वाला AR4046 नावाच्या सौर डागातून निघाली होती. फेब्रुवारीपासून सूर्याने सोडलेला हा पहिला X-श्रेणी स्फोट आहे. NOAA च्या अंतराळ हवामान अंदाज केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘28 मार्च रोजी X1.1-श्रेणीचा एक शक्तिशाली सौर स्फोट झाला. हा ज्वालामुखी नुकत्याच द़ृश्यमान झालेल्या 4046 क्षेत्रातून उसळला.‘ NOAAZo X वर या ज्वालामुखीचा एक नेत्रदीपक व्हिडीओ शेअर केला. या स्फोटासोबत सौर पदार्थाचा मोठा ढग, ज्याला कोरोनल मास इजेक्शन म्हणतात, बाहेर पडताना दिसला. CME म्हणजे प्रचंड प्रमाणात प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचे उत्सर्जन, जे सूर्याच्या स्फोटांमुळे अवकाशात फेकले जाते. जर पृथ्वी CMEच्या मार्गात आली, तर ते उपग्रह आणि वीज ग्रीडसाठी मोठा धोका ठरू शकते. सौर ज्वालामुखी म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावरून बाहेर पडणारी तीव्र विद्युतचुंबकीय ऊर्जा. हे प्रामुख्याने सौर डागांसारख्या उच्च चुंबकीय क्रियाशील भागांमध्ये घडते. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात गुंतागुंत, तुटणे आणि पुन्हा जुळण्यामुळे प्रचंड ऊर्जा प्रकाश, उष्णता आणि आवेशित कणांच्या स्वरूपात बाहेर पडते. सौर ज्वाला A, B, C, M आणि X अशा श्रेणींमध्ये विभागल्या जातात. प्रत्येक श्रेणी मागीलपेक्षा दहापट अधिक शक्तिशाली असते. X-श्रेणीचे स्फोट हे सर्वात ताकदवान आणि दुर्मीळ असतात.