नवी दिल्ली : भारतात भाज्यांचा वापर अर्थातच अनन्यसाधारण आहे. वर्षभर पनीर, भेंडी, गवार, बटाटे, टोमॅटो, कांदे यांसह डझनभर भाज्या बनवल्या जातात. पण, त्यापैकी एक अशी भाजी आहे, जी भारतीय लोक सर्वात जास्त खातात. ती म्हणजे बटाटा.सर्व भाज्यांसमवेत चालणारी आणि चवीलाही चांगली लागणारी ही भाजी भारतात सर्वाधिक वापरले जाते, असे आढळून आले आहे.
काहीवेळा भारतीय स्वयंपाकघरात हिरव्या भाज्या तयार केल्या जातात. भेंडी, गवार, भोपळा, दोडका, पडवळ, कोबी, वाटाणा भाजी आदींचा यात समावेश होतो. यामध्ये ज्यात शक्य आहे, त्यात बटाटा वापरला जातो. इतकेच नव्हे, तर अनेक प्रकारच्या स्नॅक्समध्ये देखील बटाट्याचा सर्वाधिक वापर होतो.
भारतातील कॅपिटो बटाटे 2021 च्या आकडेवारीनुसार, एक व्यक्ती एका वर्षात जास्तीत जास्त 25 किलो बटाटे खातो. हे प्रमाण इतर भाज्यांपेक्षा जास्त आहे. एका आकडेवारीनुसार, 2021 मध्ये जगभरात 376 दशलक्ष मेट्रिक टन बटाट्यांचे उत्पन्न घेण्यात आले होते. 94 दशलक्ष उत्पादनासह चीन जगातील देशांमध्ये अव्वल आहे. भारत दुसर्या क्रमांकावर आहे, तर रशिया तिसर्या व युक्रेन चौथ्या क्रमांकावर आहे. यानंतर अमेरिका आणि बांगलादेशसारखे देश राहिले आहेत.
भारतापेक्षा आणखी एक देश असाही आहे, जिथे बटाट्याचा सर्वाधिक वापर केला जातो. भारतापेक्षा बेलारूसमध्ये जास्त लोक बटाटे खातात. मिळालेल्या माहितीनुसार, बेलारूसमधील एक व्यक्ती दरवर्षी सुमारे 200 किलो बटाटे खाते आणि हे प्रमाण भारताच्या तुलनेत खूपच अधिक आहे.