विश्वसंचार

काचेवर हातोडीने तडे देऊन बनवली पोर्ट्रेट्स्!

Arun Patil

बर्न : पेंटिंगमध्ये काळानुरूप अनेक बदल होत गेले. कॅनव्हासपासून ते ग्सास पेंटिंगपर्यंत अनेक प्रकारच्या पेंटिंग्जना जगात खूप मागणी आहे. या सगळ्यात ग्लास पोर्ट्रेट साकारणार्‍या अवलियाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

घरातल्या काचेच्या वस्तू आपण खूप काळजीपूर्वक वापरतो, त्या चुकून जरी त्या फुटल्या तर वापरण्या योग्य राहत नाही; मात्र काच फोडून पोर्ट्रेट तयार करता येते, असे म्हटले तर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटू शकते. स्वित्झर्लंडमध्ये राहणारा हा अवलिया चक्क काचेला तडे देऊन त्यातून सुंदर पोर्ट्रेट तयार करतो. सायमन बर्जर हा स्वित्झर्लंडमध्ये सुतारकाम करत असताना त्याला त्याला काचेवर पोर्ट्रेट बनवण्याची कल्पना सुचली. काचेवर हातोडीने घाव देत त्याला जाणार्‍या तड्यांमधून पोट्रेट साकारणार्‍या सायमनचे पोट्रेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तुमच्यात असलेले कौशल्य गुणांना वाव मिळण्याकरीता त्यात सातत्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. सायमनने त्याच्या सर्जनशीलतेला सत्यात उतरवण्यासाठी कायम सातत्य ठेवले. आज त्याच्या काचेवरच्या पोर्ट्रेटचे प्रदर्शन पाहणे हे कलाप्रेमींसाठी कायमच पर्वणी ठरते. तुमच्यातली कला तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे बनवते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सायमन बर्जर. ग्लास पोट्रेट जगभरात प्रसिद्ध होण्यात सायमनचा मोलाचा वाटा आहे.

SCROLL FOR NEXT