File Photo
विश्वसंचार

‘त्या’ देशात फक्त दहा झाडे लावल्यास मिळते सरकारी नोकरी!

पुढारी वृत्तसेवा

मनिला : भारतात सरकारी नोकरी मिळण्यासाठी तरुण-तरुणींना खूप मेहनत करावी लागते. वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात. त्या चांगल्या मेरीटने पास कराव्या लागतात. त्यानंतर देखील कधीकधी उमेदवारांना नोकर्‍या मिळत नाहीत. अशावेळी ओळख आणि पैसे देऊन नोकरी मिळवावी लागते. काही पालक तर आपल्या मुलाला किंवा मुलीला सरकारी नोकरी मिळावी म्हणून जमीन-घर गहाण ठेवून पैसा जमा करतात; पण जगाच्या पाठीवर एक देश असाही आहे की, जिथे 10 झाडं लावल्यावर तरुण-तरुणींना सरकारी नोकरी मिळते. हा देश म्हणजे फिलीपीन्स.

फिलीपीन्स सरकारने ग्रॅज्युएशन लीगसी फॉर द एनवायर्नमेंट अ‍ॅक्ट, 2019 अंतर्गत हा नियम लागू केला आहे. फिलीपीन्समध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते. त्याचा परिणाम तिथल्या हवामानावर आणि पर्यावरणावर होतो. त्यामुळे सरकारने हा अभिनव निर्णय घेतला, ज्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी लोकांना पर्यावरणपूरक कार्य करावे लागते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने 10 झाडे लावून त्याचा पुरावा द्यावा लागतो. झाडे कुठे लावायची, त्यांची निगा कशी राखायची याबाबत नियम ठरवण्यात आले आहेत. जर हा नियम भारतात आणला गेला, तर पर्यावरण रक्षणाला किती मोठी चालना मिळेल याचा विचार केलाच पाहिजे. फक्त सरकारी नोकरीसाठी नाही, तर भविष्यासाठीही झाडे लावणे गरजेचे आहे आणि प्रत्येक सुजाण नागरिकाने ते करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT