विश्वसंचार

शनी ग्रहापेक्षाही अधिक कड्या असलेला ग्रह

Arun Patil

वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेतील शनी हा ग्रह त्याच्या कड्यांमुळे लक्ष वेधून घेत असतो. शनीला प्रामुख्याने सात कड्या आहेत. या कड्या अब्जावधी छोट्या-मोठ्या शिळा, बर्फाळ तुकड्यांपासून बनलेल्या आहेत. आपली ग्रहमालिका ज्या 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेचा एक भाग आहे, त्या आकाशगंगेतच शनीसारखा कडी असलेला आणखी एक ग्रह आहे. मात्र, त्याची कडी शनीपेक्षा तब्बल 200 पट अधिक मोठी आहे. या ग्रहाचे नाव आहे 'जे1407बी'. त्याच्या चंद्राचा आकार पृथ्वी किंवा मंगळ ग्रहाइतका मोठा आहे!

2012 मध्ये या ग्रहाचा शोध लावण्यात आला होता. त्यावेळी तो आपल्या सौरमंडळाबाहेर शोधलेला पहिला 'कडीधारी' ग्रह होता. आपल्या सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. मात्र 'जे1407बी' गुरू किंवा शनीपेक्षाही मोठ्या आकाराचा आहे. त्याची कडी शनीच्या कडीपेक्षा 200 पट अधिक मोठी आहे. त्यामुळे त्याला खगोलशास्त्रज्ञ 'सुपर सॅटर्न' म्हणू लागले. अनेक लोक त्याला 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' असेही गंमतीने म्हणतात. या ग्रहाला तब्बल 37 कड्या आहेत. त्याचे चंद्रही खगोलशास्त्रज्ञांच्या कुतुहलाचा विषय आहेत. त्याच्या चंद्राचा आकार पृथ्वी किंवा मंगळाइतका मोठा आहे.

SCROLL FOR NEXT