विश्वसंचार

‘हा’ महागडा सुका मेवा असतो आरोग्यासाठी लाभदायक

Arun Patil

नवी दिल्ली : सुक्या मेव्यामध्ये अनेक पदार्थांचा समावेश होतो. त्यामध्ये बेदाणे, काजू, अक्रोड, पिस्ता, खारीक असे अनेक घटक असतात. सुका मेवा महागही असतो, पण तो आरोग्याला लाभदायकही असतो. असाच एक अत्यंत महागडा सुका मेवा म्हणजे पाईन नट्स किंवा चिलगोजा. पाईन नट्सची चवही स्वादिष्ट असते. पाईन नट्सचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

पाईन नट्स लोहाचा एक चांगला स्रोत आहे, जो शरीरातील लोहाची कमतरता दूर करू शकतो. पाईन नट्समुळे रक्ताची कमतरताही भरून निघते. रक्ताच्या कमतरतेमुळे होणारा एनिमिया देखील बरा होऊ शकतो. पाईन नट्समध्ये नैसर्गिकरित्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करू शकतात. संशोधनानुसार, हे नट्स खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

पाईन नट्स 'ओमेगा-3' फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे, जे मेंदूचे आरोग्य सुधारू शकतात. यामुळे विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता वाढते आणि मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही पाईन नट्स फायदेशीर आहे. यात पिनोलेनिक ऍसिड असतं, जे भूक नियंत्रित ठेऊन वजन कमी करण्यास मदत करू शकतात. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी पाईन नट्सचे सेवन फायदेशीर ठरू शकते, कारण त्यात धोकादायक उच्च ग्लायसेमिक निर्देशांक नसतो आणि रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास ते मदत करू शकतात.

अँटिऑक्सिडंट्स आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. जर तुम्ही पाईन नट्स खात असाल तर त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स (व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई) तुमच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतील. पाईन नट्स खाल्ल्याने हाडं मजबूत होतात, कारण त्यात असलेले फॅटी अ‍ॅसिड हाडांच्या विकासात आणि मजबुतीमध्ये मोठी भूमिका बजावतात. तसेच सांधेदुखीमध्ये आराम देतात. पाईन नट्स खाल्ल्याने कोलेस्टेरॉल संतुलित राहते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT