विश्वसंचार

पिकासोच्या चित्राला 11 अब्ज रुपयांची किंमत

Arun Patil

लंडन : स्पेनचा पाब्लो पिकासो हा आधुनिक काळातील जगभर प्रसिद्धी पावलेला एक महान चित्रकार. वेगळ्या शैलीतील त्याची चित्रे आजही मोठ्या किमतीत विकली जात असतात. आता त्याचे एक प्रसिद्ध पेंटिंग 'वुमन विथ अ वॉच'ला एका लिलावात 13.9 कोटी डॉलर्स म्हणजेच 11.57 अब्ज रुपयांची किंमत मिळाली आहे. ही पिकासोच्या एखाद्या पेंटिंगला मिळालेली दुसरी क्रमांकाची सर्वात मोठी किंमत आहे. ही यावर्षीची लिलावात सर्वाधिक किमतीत विकली गेलेली कलाकृती ठरली आहे.

यापूर्वी 2015 मध्ये पिकासोच्या एका पेंटिंगला सुमारे 15 अब्ज रुपयांची किंमत मिळाली होती. 'वुमन विथ अ वॉच' हे पेंटिंग पिकासोने 1932 मध्ये बनवले होते. या पेंटिंगमध्ये फ्रान्सची मॉडेल मेरी-थेरेसी वॉल्टरला चित्रित करण्यात आले आहे. मेरी ही पिकासोची प्रेयसीही होती व तिला पिकासोने आपल्या अनेक पेंटिंगमध्ये स्थान दिलेले आहे. ती सतरा वर्षांची असताना पॅरिसमध्ये

45 वर्षे वयाच्या पिकासोला भेटली. पिकासोचा युक्रेनी बॅलेरीना असलेल्या ओल्गा खोखलोवा हिच्याशी विवाह झाला होता. मात्र तरीही तो मेरीच्या प्रेमात पडला. त्यानंतर ती त्याच्या अनेक पेंटिंगचा विषय बनली. आता मोठ्या किमतीत लिलाव झालेल्या पेंटिंगमध्ये मेरी एखाद्या सिंहासनासारख्या खुर्चीवर बसलेली दाखवले आहे. लिलावात ठेवण्यापूर्वी या पेंटिंगची किंमत 12 कोटी डॉलर्स ठरवण्यात आली होती. यापूर्वी हे पेंटिंग एमिली फिशर लँडो यांच्याकडे होते. त्यांनी ते 1968 मध्ये खरेदी केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT