न्यूयॉर्क : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी नुकतीच एक्स प्लॅटफॉर्मवर एक मजेशीर पोस्ट शेअर केली. जी काही क्षणांतच व्हायरल खूपच व्हायरल झाली. आता फोटोला व्हिडीओत रूपांतरित करणं अगदी सोपं झालंय, असं त्याने यावेळी सांगितलं. फक्त फोटोवर थोडा जास्त वेळ बोट दाबा म्हणजेच लाँग प्रेस करा आणि तो तत्काळ व्हिडीओत रूपांतरित होईल, असे मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
मस्क यांनी याची माहिती देणारा एक छोटासा व्हिडीओही अपलोड केला आहे. ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. ही खास सुविधा त्यांच्या xAI कंपनीच्या ग्रोक एआय चॅटबॉटशी जोडलेली आहे. ज्यामुळे सामान्य लोकांना क्रिएटिव्ह कामं करणं सोपं होईल. मस्क यांच्या या निर्णयाने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी चर्चेची ठिणगी पेटलीय. कारण, आता कोणालाही महागड्या सॉफ्टवेअरची गरज भासणार नाही. ही प्रक्रिया अतिशय साधी आहे. एखादी इमेज घ्या, त्यावर लाँग प्रेस करा, मग ती इमेज व्हिडीओत बदलेल. त्यानंतर तुम्ही स्वतःचा प्रॉम्प्ट (सूचना) देऊन व्हिडीओला पर्सनल टच देऊ शकता, मस्क यांनी सांगितले. उदाहरणार्थ, मस्क यांनी स्वतःचा प्रॉम्प्ट वापरून एक जोडप्याच्या फोटोला मजेदार मॅपेटस् (पपेटस्) सारखं हलणाऱ्या व्हिडीओत रूपांतरित केलं. यात ॲनिमेशनचीही जोड होते, ज्यामुळे स्थिर फोटो जिवंत वाटू लागतो. ही सुविधा ग्रोकच्या विस्तारत्या क्रिएटिव्ह साधनांमधील एक भाग आहे, ज्यात लेखन, इमेज तयार करणं आणि रिअल-टाइम डेटा वापरणं यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, ही एआय-आधारित टूल सामान्य यूजर्ससाठी क्रांतिकारी पाऊल ठरेल.
कारण, यातून काही सेकंदांतच व्यावसायिक दर्जाचा व्हिडीओ तयार होतो. ग्रोक ही xAI ची लेटेस्ट एआय निर्मिती आहे, जी एलन मस्क यांच्या दृष्टीतून तयार झाली. या फीचरमुळे यूजर्स फोटो अपलोड करून त्यात हालचाल, संवाद किंवा कथा जोडू शकतात. मस्क यांच्या पोस्टनंतर अनेकांनी हे ट्राय करून स्वतःचे व्हिडीओ तयार केले आणि शेअर केले, ज्यामुळे #GrokVideo सारखे ट्रेंड सुरू झाले. ही सुविधा फक्त मजेसाठी नाही, तर शिक्षण, मार्केटिंग किंवा सोशल मीडिया कंटेंटसाठीही उपयुक्त ठरेल. मस्क यांनी हा व्हिडीओ ग्रोक वापरूनच तयार केला असल्याचं सांगितलं, ज्याने ‘एआय’ च्या सर्जनशीलतेवर विश्वास वाढवला. ‘हे फीचर ‘एआय’ ला लोकांच्या हातात आणणारं आहे, ज्यामुळे क्रिएटिव्हिटी प्रत्येकासाठी उपलब्ध होईल,’ असे एका तंत्र तज्ज्ञाने म्हटलंय. ‘एआय’ ने नुकतेच ग्रोक 4 ची सेवा जगभरातील सर्व यूजर्ससाठी मोफत जाहीर केली आहे.
याचा अर्थ, कोणालाही पैसे न देता हे ‘एआय’ वापरता येईल. हे एक्स प्लॅटफॉर्मवरून, तसेच आयओएस आणि अँड्रॉइड ॲपद्वारे उपलब्ध आहे. भारतातही हे सहज डाऊनलोड करता येईल, ज्यामुळे लाखो भारतीय वापरकर्त्यांना फायदा होईल. मस्कच्या कंपनीने यापूर्वीही ग्रोकला विकिपीडियासारख्या प्लॅटफॉर्मला टक्कर देणाऱ्या ‘ग्रोकिपेडिया’ सारख्या योजना जाहीर केल्या होत्या; पण हे नवीन फीचर त्यातलं सर्वात मजेदार आहे.