File Photo
विश्वसंचार

परप्लेक्सिटीच्या नव्या टूलमुळे ‘एआय’मध्ये घडणार क्रांती!

पुढारी वृत्तसेवा

कॅलिफोर्निया : परप्लेक्सिटी एआयने आपले डीप रिसर्च टूल लाँच केले असून, गुगल व चॅटजीपीटीसाठी आव्हान उभे करणार्‍या या टूलच्या माध्यमातून युजर आपल्याला अपेक्षित असाईनमेंट सहजपणे करून घेऊ शकतील. याचे प्रो-युजर दिवसाकाठी 500 प्रश्न विचारू शकतात. याचवेळी फ्री युजरना मात्र याबाबत काही मर्यादा असू शकतात.

एआय दिग्गज ओपन एआय व गुगलला टक्कर देऊ शकेल, अशा या टूलच्या माध्यमातून सर्च केल्या गेलेल्या विषयावर माहितीवर संक्षिप्त अहवाल तयार करेल, अशी याची संकल्पना आहे. जेमिनी आणि चॅट जीपीटीच्या एआय टूलसह या नव्या टूलची स्पर्धा आता यापुढे रंगणार आहे. नव्या एआय टूर परप्लेक्सिटीची नव्या वेबसाईटवर माहिती उपलब्ध करून दिली गेली असून, कंपनीने लवकरच आता आयओएस, अ‍ॅन्ड्रॉईड व मेक व्हर्जनसाठी ते रोल आऊट केले जाईल, असे यात नमूद केले आहे.

परप्लेक्सिटी एआय हे एक सर्च इंजिन असून, विविध भाषांमध्ये युजरनी विचारलेल्या प्रश्नांचे ते समर्पक उत्तर देते. भारतीय वंशाचे अरविंद श्रीनिवास या कंपनीचे सीईओ व सहसंस्थापक आहेत. त्यांनी 2022 मध्ये अँडी कॉनविंस्की, डेनिस यारात्स व जॉनी हो यांच्यासह या कंपनीची स्थापना केली होती. परफ्लेक्सिटीने सध्या असा दावा केला आहे की, जेमिनी, 03-मिनी, ग्रोक 2 यांना सहज पिछाडीवर टाकू शकेल. सीईओ अरविंद श्रीनिवासन यांनी असाही दावा केला आहे की, ओपन एआयच्या तुलनेत त्यांचे टूल अधिक जलद व अधिक किफायतशीर असणार आहे. जेमिनीचा डीप रिसर्च जुने मॉडेल 1.5 प्रो पेक्षा कमी आहे. याचवेळी चॅटजीपीटीचे डीप रिसर्च केवळ प्रो-युजर्ससाठी उपलब्ध आहे.

सध्याची प्रणाली विचारात घेता चॅटजीपीटी डीप सर्च आपल्या प्रो- युजर्सना 100 प्रश्नांचे उत्तर देते आणि 30 मिनिटांपासून काही तासांपर्यंत युजर्ससाठी काम करण्याची त्याची क्षमता आहे. त्या तुलनेत परप्लेक्सिटी डीप सर्च प्रो रोज युजर्सच्या 500 प्रश्नांची उत्तरे देईल. मोफत सेवासुविधा घेणार्‍या युजरबाबत मात्र काही मर्यादा असणार आहेत. या टूलच्या माध्यमातून अगदी कठीणपेक्षाही कठीण प्रश्नांची उकल कमाल तीन मिनिटांच्या आतच होईल, असे कंपनीच्या पदाधिकार्‍यांचा दावा आहे. दुसरीकडे, गुगलने चॅटजीपीटी आणि परफ्लेक्सिटीच्या आधीच आपले डीप रिसर्च टूल लाँच केले होते. हे टूल जेमिमी 1.5 प्रोवर आधारित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT