गणपती बाप्पांच्या आवडत्या गोष्टींमध्ये मोदक, दुर्वा यांच्यासह जास्वंदाच्या लालचुटूक फुलांचाही समावेश होतो. 
विश्वसंचार

बाप्पांच्या आवडत्या जास्वंदाचा चहा असतो गुणकारी

बाप्पांच्या आवडत्या जास्वंदाचा चहा असतो गुणकारी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : गणपती बाप्पांच्या आवडत्या गोष्टींमध्ये मोदक, दुर्वा यांच्यासह जास्वंदाच्या लालचुटूक फुलांचाही समावेश होतो. जास्वंदाला इंग्रजीत ‘हिबिस्कस’ या नावाने ओळखले जाते. जास्वंद ही आशिया खंडात आढळणारी सदारहरित वनस्पती आहे. भारतात कित्येक वर्षांपासून जास्वंदाच्या फुलांचा वापर पूजा आणि विधींसाठी केला जातो. जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या सुकवून त्यांचा नैसर्गिक रंग म्हणून वापर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, बाप्पांच्या आवडत्या जास्वंदाचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. विशेषतः जास्वंदाचा चहाही आरोग्यासाठी गुणकारी असतो.

जास्वंदाचा चहा किंवा जास्वंदाचा अर्क हा मेंदूसाठी अत्यंत उपयुक्त असतो. अस्वस्थता जाणवत असेल, रक्तदाबाची समस्या असेल तर त्यावर जास्वंदाचा चहा पिणे अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. तुम्ही जे पाणी पिता, त्यात जास्वंदाचे परागकण काढून त्याच्या पाकळ्या टाकून ते पाणी प्यायले तर तुमच्या शरीराला चांगले अँटिऑक्सिडंट मिळतात. जर त्वचेच्या समस्या असतील तर जास्वंदाची पावडर, जास्वंदाच्या पाकळ्यांचे पाणी, जास्वंदाचा चहा (हिबिस्कर टी) प्यायल्यास अत्यंत उपयुक्त ठरू शकते. पोटाच्या समस्या असतील तर जास्वंदाचा चहा फायदेशीर ठरू शकतो. कारण तो सहज पचवता येतो.

जास्वंदाच्या चहाचे आणखी काही फायदे : जास्वंदाच्या चहामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंटस् भरपूर असतात. ते शरीरातील मुक्त रॅडिकल संयुगाशी लढण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अतिरिक्त ताण पडतो आणि ते कमकुवत होऊ शकते. नैसर्गिक उपायांसाठी जास्वंदाच्या चहाचे सेवन केले जाऊ शकते. परंतु जर एखाद्याला तीव— रक्तदाबाचा त्रास होत असेल आणि औषधोपचार होत असतील तर अशा नैसर्गिक उपायांमध्ये सहभागी होण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

रक्तातील फॅटस्चे प्रमाण विविध हृदयविकारांना कारणीभूत ठरू शकते, म्हणून एक कप गरम जास्वंदाचा चहा प्यायल्याने नैसर्गिकरीत्या खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते आणि शरीर आतून लवकर बरे होऊ शकते. जास्वंदाच्या अर्कामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडस् कमी होतात, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. बीएमआय पातळी कमी करणेदेखील फायदेशीर आहे. ज्या लोकांना सतत मूड स्विंग, मळमळ किंवा अस्वस्थता असते, त्यांनी नियमित जास्वंदाचा गरम चहा प्यावा, कारण ते तुमच्या मज्जातंतूंना शांत करते आणि तुम्हाला आराम देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT