जगातील सर्वात उंच इमारतीचा मालक कोण? Pudhari File Photo
विश्वसंचार

जगातील सर्वात उंच इमारतीचा मालक कोण?

पुढारी वृत्तसेवा

अबुधाबी : दुबई ही आता नवलाईची नगरीच बनली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई नगरीचा जेव्हा-जेव्हा उल्लेख होतो तेव्हा बुर्ज खलिफाचे नाव आघाडीवर येते. 828 मीटर उंच या इमारतीत 163 मजले असून ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज खलिफाचे बांधकाम 2004 मध्ये सुरू झाले आणि 2010 मध्ये पूर्ण झाले. म्हणजेच सहा वर्षांत या गगनचुंबी इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. बुर्ज खलिफाच्या आतील विलोभनीय सौंदर्याबद्दल तुम्ही खूप ऐकले आणि वाचले असेल. तुम्ही त्यात असलेल्या फ्लॅटस् आणि हॉटेल्सच्या किमतींबद्दल ऐकले असेल; पण तुम्हाला माहिती आहे का या सर्वात उंच इमारतीचा मालक कोण आहे? ही इमारत कोणी बांधली? आज आपण जगातील सर्वात उंच इमारतीच्या मालकाची कहाणी जाणून घेऊया.

अनेकांचा असा समज आहे की दुबईचे राजा किंवा ‘यूएई’ चे सुल्तान बुर्ज खलिफाचे मालक आहेत. खरं सत्य त्यापेक्षा वेगळे आहे. ही इमारत दुबईची प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपनी ‘एमार प्रॉपर्टीज’ने विकसित केली ज्याचे संस्थापक आणि मालक मोहम्मद अली अलाब्बर आहेत. अली अलाब्बर दुबईचे एक मोठा उद्योगपती आणि रिअल इस्टेट टायकून आहेत. म्हणजे तांत्रिकद़ृष्ट्या बुर्ज खलिफा त्यांच्या कंपनीची मालमत्ता आहे.

बुर्ज खलिफाचे खरे मालक, एमार प्रॉपर्टीज, ही संयुक्त अरब अमिरातीची प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. एमार प्रॉपर्टीजचे अध्यक्ष मोहम्मद अलाब्बर आहेत, जे नेहमीच चार पावले पुढचा विचार करतात. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्यक्षात आणण्यात मोहम्मद अलाब्बर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बुर्ज खलिफा तीन कंपन्यांनी संयुक्तपणे बांधला कारण या तिन्ही कंपन्यांकडे स्वतःचे वेगळे कौशल्य होते. सॅमसंग सी अँड टी, बेसिक्स आणि अरबटेक या तीन कंपन्यांनी एकत्र येऊन बुर्ज खलिफाचे बांधकाम पूर्ण केले. सॅमसंग C& T एक दक्षिण कोरियन कंपनी, प्रगत अभियांत्रिकी क्षमतांसाठी ओळखली जाते.

बुर्ज खलिफाच्या टॉवरच्या डिझाइन आणि बांधकामात सॅमसंग सी अँड टीने महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे, बेसिक्स बेल्जियमची कंपनी असून तिने बुर्ज खलिफा बांधण्यासाठी आपल्या तांत्रिक कौशल्यांचा आणि संसाधनांचा वापर केला. तसेच अरबटेक संयुक्त अरब अमिरातीची कंपनीने बांधकाम प्रक्रियेत योगदान दिले. 2004 मध्ये बुर्ज खलिफाचे बांधकाम सुरू झाले आणि पूर्ण होण्यासाठी सहा वर्षे लागली. 2010 मध्ये या उत्तुंग इमारतीचे अधिकृत उद्घाटन झाले. या इमारतीची एकूण उंची 828 मीटर असून एकूण 163 मजले आहेत. या गगनचुंबी इमारतीत 58 हाय-स्पीड लिफ्ट आहेत, ज्या तुम्हाला काही सेकंदात वरच्या मजल्यावर घेऊन जातात. तसेच या इमारतीचा वरचा भाग 95 किलोमीटर अंतरावरूनही दिसतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT