व्हॅले : जगात अशी अनेक शहरे आहेत, जिथे लोकांच्या खाण्याच्या सवयी एका सेट पॅटर्नच्या आहेत. म्हणजेच बरेच लोक बाहेरचे खातात आणि अनेक ठिकाणी असे देखील होते की, लोकांना रेस्टॉरंटमधून खायला आवडत नाही; पण ब्रिटनमधील एका शहरात वेगळेच वातावरण आहे. येथील अर्ध्याहून अधिक लोक लठ्ठ आहेत आणि त्यांना बाहेरचे जेवण इतके आवडते की ते दिवसातून बाहेरून मागवलेले पदार्थ 3 वेळा खातात. त्यांच्यामुळे डिलिव्हरी करणारे लोक अडचणीत येतात.
डेली स्टार न्यूज वेबसाईटनुसार, साऊथ वेल्समधील ईबीबीडब्ल्यू व्हॅले हे शहर युनायटेड किंगडममधील असे शहर मानले जाते, जेथे बहुतेक लोक लठ्ठ आहेत. हे शहर एकेकाळी स्टील हब होते. पण, आता ते लठ्ठ लोकांसाठी प्रसिद्ध झाले आहे. येथे असे अनेक लोक आहेत, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे आणि त्यांचे वजन जास्त आहे. हे लोक लठ्ठ वर्गात मोडतात. अनेक डिलिव्हरी चालकांनी असा दावा केला आहे की, ते एकाच ग्राहकाच्या घरी दिवसातून तीन-तीन वेळा जातात.
37 वर्षीय ब्युटीशियन जोडी ह्यूजने डेली मेलशी बोलताना सांगितले की, तिचे शहर लठ्ठपणाशी झुंजत आहे. तिचे स्वतःचे वजन खूप वाढले होते, ज्यामुळे तिला गॅस्ट्रिक बँड घालावा लागला होता. तिने सांगितले की, शहरात अनेक टेक-वे आणि फास्ट फूडची ठिकाणे आहेत, जी लोकांची पोटे भरत आहेत. लोकांना या फास्ट फूड चेनचे व्यसन लागले आहे, त्यामुळे ते लठ्ठ होत आहेत, असे तिचे मत आहे. त्यामागचे सर्वात मोठे कारण अर्थव्यवस्था आहे, असेही यासाठी सांगितले जाते. फास्ट फूड ही सर्वात स्वस्त वस्तूंपैकी एक आहे. त्यामुळे जास्त लोक ते खात आहेत. दुसरे कारण म्हणजे लोकांकडे वेळ कमी आहे. चवदार, निरोगी आणि स्वस्त अन्न तयार करणे नेहमीच सोपे नसते. या परिसरात वजन कमी करण्याचे काही कोर्सेस चालवले जातात, ज्यामध्ये लोक नोंदणी करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्कॉट या 55 वर्षीय स्थानिक व्यावसायिकाने सांगितले की, जर एखाद्याला हेल्दी आणि ऑरगॅनिक अन्न खायचे असेल तर त्यांना त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत लोक तेच अन्न खाण्यास प्राधान्य देतात, जे सहज उपलब्ध आहे आणि स्वस्तही आहे.