विश्वसंचार

ओरांगऊटान चालवतो गाडी!

Arun Patil

दुबई : एप वर्गातील वानरांमध्ये गोरिला, चिम्पांझी, ओरांगऊटान आदींचा समावेश होतो. या प्राण्यांमध्ये बुद्धी चांगली असते. आता अशाच एका ओरांगऊटानचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हा ओरांगऊटान आरामात एक गोल्फ कार्ट चालवत असताना यामध्ये दिसते. स्टिअरिंग वळवून गाडी वळवणे, आरशात पाहून वेग कमी करणे, आजूबाजूचे द़ृश्य न्याहाळणे अशा सर्व गोष्टी तो मानवासारख्याच करीत असल्याचे पाहून लोक थक्क झाले!

या ओरांगऊटानचे ड्रायव्हिंग स्किल पाहून लोकांना हा एक प्राणी आहे हे पटणे कठीण झाले. हा व्हिडीओ दुबईचा आहे. संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची कन्या शेखा फातिमा राशिद अल मकतूम यांचे दुबईत एक प्राणीसंग्रहालय आहे. तिथे अन्य काही प्राण्यांसमवेत ओरांगऊटानही आहेत.

व्हिडीओत दिसणार्‍या या ओरांगऊटानचे नाव 'रेम्बो' असे आहे. तो गोल्फ कार्टसह अन्यही काही छोटी वाहने कुशलतेने चालवू शकतो. लहान वयापासूनच तो वेगवेगळी वाहने चालवतो. तसे पाहता हा व्हिडीओही बराच जुना आहे; पण आता पुन्हा एकदा तो व्हायरल झाल्याने रेम्बो चर्चेत आला आहे. अनेक लोक या ओरांगऊटानचे कौतुक करीत आहेत. 1.59 मिनिटांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT