OpenAI Countersues Apple | गुपिते चोरली; ॲपलवर ओपनएआयचा दावा 
विश्वसंचार

OpenAI vs Apple | गुपिते चोरली; ॲपलवर ओपनएआयचा दावा

पुढारी वृत्तसेवा

कॅलिफोर्निया : चॅटजीपीटीनिर्माती कंपनी ओपनएआयने टेक दिग्गज ॲपलवर व्यवसायिक गुपिते चोरल्याचा आरोप करत प्रतिदावा दाखल केला आहे. यापूर्वी जुलैमध्ये ॲपलने ओपनएआयवर गोपनीय माहिती चोरल्याचा खटला दाखल केला होता.

कॅलिफोर्नियात दाखल केलेल्या प्रतिदाव्यात ओपनएआयने म्हटले आहे की, त्यांच्याकडे सहा महिने काम केलेल्या एका कर्मचाऱ्याला ॲपलने पुन्हा कामावर घेतले. या कर्मचाऱ्याने ओपनएआयच्या आगामी नवीन उपकरणांची संवेदनशील कागदपत्रे स्वतःच्या फोनवर पाठवून ती ॲपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केली. तसेच, ॲपल हार्डवेअर पुरवठादारांना ओपनएआयसोबत काम करण्यापासून परावृत्त करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

ॲपलचे प्रत्युत्तर

ॲपलने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, मूळ खटल्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ॲपलचे माजी डिझायनर सर जॉनी आयव्ह यांच्या 'आयओ प्रॉडक्ट्स' या स्टार्टअपवरही ॲपलने यापूर्वीच खटला दाखल केला आहे. भविष्यातील एआय उपकरणांवरून दोन्ही कंपन्यांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT