विश्वसंचार

उंदरामुळे लागलेल्या आगीत एक कोटी रुपयांचे नुकसान!

Pudhari News

हैदराबाद : उंदरांमुळे कोणत्या प्रकारचे नुकसान होऊ शकते हे हैदराबादच्या मुशीराबादमधील एका घटनेने समोर आले आहे. तिथे एका कार शोरूममध्ये आग लागून तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता तपासणीत असे दिसून आले आहे की यासाठी एक उंदीर जबाबदार होता!

ही आग 8 फेब्रुवारीला लागली होती. त्यावेळी तीन मोटारींसह सुमारे एक कोटी रुपयांचे सामान जळून खाक झाले होते. पोलिसांनी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असे मानून केस बंद केली होती. त्यानंतर एका खासगी कंपनीने त्या दिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आगीचे कारण उंदीर असल्याचे दिसून आले. त्या दिवशी सकाळी शोरूममध्ये पूजाअर्चा झाली होती व तेलाचा दिवा लावण्यात आला होता. हा दिवा रात्रभर जळत राहिला. रात्री 11 वाजून 51 मिनिटांनी ग्राहक सेवा कक्षाच्या त्या मेजावर एक उंदीर आल्याचे दिसून आले. त्याने दिव्यातील जळती वात खेचली व ती मेजाजवळ असलेल्या खुर्चीवर पडली. त्यामुळे खुर्चीने पेट घेतला व ही आग आजुबाजूच्या फर्निचरमध्ये पसरली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT