विश्वसंचार

जगातील सर्वात वृद्ध कुत्रा

Arun Patil

लंडन : गिनिज बुकमध्ये श्वानांबाबतही अनेक विक्रमांची नोंद झालेली आढळून येते. त्यामध्ये सर्वात उंच कुत्रा किंवा सर्वात लहान आकाराचा कुत्रा अशा विक्रमांची नोंद असते; मात्र एका कुत्र्याने वयाच्या बाबतीतही विश्वविक्रम केला आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या श्वानाचे आयुष्य हे दहा-अकरा वर्षांचे असते; मात्र हा कुत्रा 31 वर्षांचा आहे.

तुम्ही आजवर बरेच श्वान पाहिले असतील. वेगवेगळ्या प्रकारचे श्वान जगभरात पाहायला मिळतात. त्यापैकी काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी व महागडीही असतात; पण सध्या असा श्वान चर्चेत आला आहे, जो जगात असा एकमेव आहे. एक असा श्वान ज्याच्यासारखा दुसरा कदाचित तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. या श्वानाचा वर्ल्ड रेकॉर्डही झाला आहे. गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. 'बॉबी' असे या श्वानाचे नाव आहे. तो पोर्तुगालचा आहे. त्याचा जन्म 1992 मध्ये झाला. त्याचे वय 31 वर्षे आहे. 11 मे रोजी त्याने आपला 31 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या बर्थडेची ग्रँड पार्टीही ठेवण्यात आली. 'जगातील सर्वात वयस्कर कुत्रा' म्हणून बॉबीची गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.

SCROLL FOR NEXT