विश्वसंचार

घनदाट जंगलात सापडली 3 हजार वर्षांपूर्वीची 417 शहरे!

Arun Patil

ग्वाटेमाला : दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमाला येथील घनदाट जंगलात 417 प्राचीन शहरांचा शोध लागला असून संशोधकांनुसार, या शहरांचा शोध हा इजिप्तमधील पिरॅमिडइतकाच महत्त्वपूर्ण ठरू शकतो. ही सर्व शहरे 3 हजार वर्षांपूर्वीची असावी, असा अंदाज असून या शहरांना जोडणारा 177 किलोमीटरचा महामार्गदेखील आढळून आला आहे.

'वॉशिंग्टन पोस्ट'च्या वृत्तानुसार, शहरांचे नेटवर्क, हायड्रोलिक सिस्टीम व शेतीसाठी आवश्यक सुविधा हा सर्व साचा हेच दर्शवतो की, मध्य अमेरिकेत 3 हजार वर्षांपूर्वी येथे ही शहरे वसलेली होती. या शहरात जो समूह राहत होता, तो आपल्या समजेपेक्षा अधिक प्रगल्भ होता. या 417 शहरांचा शोध रडार तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात आला असून या शोधामुळे अमेरिकन महाद्वीपाच्या इतिहासात व्यापक बदल घडू शकतो.

2015 पासूनच अमेरिकन व ग्वाटेमालाचे संशोधक, वैज्ञानिक याच्या शोधात होते. त्याला आता मोठे यश लाभले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT