उत्तर अमेरिका-युरेशियन प्लेट अजूनही एकच! Pudhari File Photo
विश्वसंचार

उत्तर अमेरिका-युरेशियन प्लेट अजूनही एकच!

डर्बी युनिव्हर्सिटीचे डॉ. डॉर्डन फेथेन यांनी याबाबतचे केले संशोधन

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की उत्तर अमेरिका आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेटस् या अद्याप पूर्णपणे वेगळ्या झालेल्या नाहीत. यापूर्वी असे अनुमान करण्यात आले होते की कोट्यवधी वर्षांपूर्वीच या प्लेटस् वेगळ्या झाल्या; मात्र नव्या संशोधनात आढळले की ही प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे.

डर्बी युनिव्हर्सिटीचे डॉ. डॉर्डन फेथेन यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांंनी आईसलँडच्या ज्वालामुखींच्या स्तराखाली काय आहे याबाबतचे हे संशोधन केले. स्वित्झर्लंड, इटली आणि अमेरिकेतील वैज्ञानिकांनी त्यांना याबाबत सहाय्य केले. संशोधनावेळी वैज्ञानिकांच्या टीमने ‘अफ्रा’ असे नाव असलेल्या आफ्रिकेतील एका क्षेत्रामध्ये व आईसलँडच्या रचनेमध्ये अनेकबाबतीत साम्य असल्याचे पाहिले. या दोन्ही ठिकाणच्या भेगा कशा असतात याचीही त्यांनी पाहणी केली. अभ्यासांती त्यांना एका नव्या वैशिष्ट्याचा छडा लागला, ज्याला ‘रिफ्टेड ओशनिक मॅग्मॅटिक’ पठार किंवा ‘आरओएमपी’ असे म्हटले जाते. या संशोधनातून असे समजले की उत्तर अमेरिका आणि यूरेशियन प्लेटस् अद्याप पूर्णपणे वेगळ्या झालेल्या नाहीत. डॉ. डॉर्डन फेथेन आणि त्यांच्या टीमने केलेल्या या संशोधनातून एक नवा वाद निर्माण होऊ शकतो. याचे कारण म्हणजे अद्यापही अनेक भूगर्भ संशोधकांना असे वाटते की, सुमारे 52 दशलक्ष वर्षांपूर्वीच उत्तर अमेरिका आणि यूरेशियन प्लेटस्चे विभाजन झाले आहे. मात्र डॉ. फेथेन यांचे म्हणणे आहे की अद्याप त्यामध्ये फैलाव होत आहे आणि या प्लेटस्अजूनही तुटण्याच्या प्रक्रियेमध्येच आहेत. त्यामुळे खरोखरच सध्या पृथ्वीच्या पाठीवर सात ‘वेगळे’ खंड आहेत का हा सुद्धा एक नवा संशोधनाचा विषय बनू शकतो!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT