यूट्यूबर निशा शाह Pudhari File Photo
विश्वसंचार

दोन कोटींची नोकरी सोडली अन् बनली यूट्यूबर!

arun patil

नवी दिल्ली : मोठी स्वप्नं पाहून गलेलठ्ठ पगाराच्या नोकर्‍या सोडणारे अनेक लोक जगाच्या पाठीवर आहेत. ‘वो जीना भी कोई जीना है, जिसमें किक न हो’, हा सलमान खानचा ‘किक’ सिनेमातील डायलॉग निशा शहा या तरुणीने जणू चांगलाच मनावर घेतला. त्यामुळेच निशाने 2 कोटी पगारांच्या नोकरीवर लाथ मारली आणि यूट्युबर बनली. मात्र, अशी-तशी नाही, तर यशस्वी यूट्यूबर बनली. कारण 2 कोटींची नोकरी सोडणारी निशा आता चौपट म्हणजे तब्बल 8 कोटी रुपयांची कमाई करत आहे!

यूट्यूबर निशा शाहची करिअरची वाटचाल

पर्सनल फायनान्स यूट्यूबर निशा शाहची करिअरची वाटचाल अत्यंत रंजक आहे. अनेक वर्षे इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून निशाने नोकरी केल. लंडनमधील बँकर क्रेडिट अ‍ॅग्रिकोलमध्ये सहयोगी संचालक म्हणून ती अखेरची नोकरी करत होती. तिथे तिला 2 कोटी वार्षिक पगार होता. गलेलठ्ठ पगार आणि कंपनीत मानाचं स्थान तरीही निशाचं मन काही तिच्या त्या कामात रमत नव्हतं. तिला तिचं काम करताना फारशी मजा येत नव्हती. तिला ती नोकरी आव्हानात्मक वाटत नव्हती. निशाने याबाबत म्हटलं की, कॉर्पोरेटमध्ये नोकरी करताना मला जवळपास 9 वर्षे झाली होती. तिथे मला आव्हानात्मक काही वाटत नव्हतं. मला पैसे कमावत इतरांना मदत करण्याचा मार्ग शोधायचा होता. मी बँकिंगमध्ये जे काही करत होते त्याची कॉर्पोरेट, इतर कंपन्यांना मदत करत होत होती, निशा शाह हिने एका मुलाखतीत सांगितले. पर्सनल फायनान्स क्षेत्रातील तिची आवड पूर्णवेळ व्यवसायात बदलण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले. तेव्हा तिला यूट्यूबर हा पर्याय सापडला. अनेक दिवस याबाबत तिने बराच रिसर्च केला. त्यानंतर तिने डिसेंबर 2021 मध्ये यूट्यूबवर पदार्पण केलं.

निशा शाहचं ‘छळीलहर’ नावाचं यूट्यूब चॅनेल

निशाने पर्सनल फायन्सास आणि सेल्फ डेव्हलपमेंटवर व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. तिने तिच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंगच्या कमाईतून व्हिडीओ बनवण्यासाठी लागणार्‍या साहित्यांची खरेदी केली. त्यानंतर दोन महिन्यांनंतर जानेवारीमध्ये तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. येत्या काही दिवसांत तिला लाखो रुपयांचा बोनस कंपनीकडून मिळणार होता. मात्र, आपल्या आवडीच्या कामासाठी तिने त्यावरही पाणी सोडलं. निशा शाहचं ‘छळीलहर’ नावाचं यूट्यूब चॅनेल आहे. ज्यावर 1.18 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून निशा शाह आजच्या घडीला तिच्या पगाराच्या 4 पट कमाई करते. जून 2022 मध्ये, तिने आठवड्यातून दोनदा व्हिडीओ पोस्ट करण्याचे ठरवले आणि एक इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून डेली लाईफ पोस्ट करणे सुरू केले. निशा तिच्या यूट्यूब प्रवासाबाबत सांगते की, ‘मला 1000 सबस्क्रायबर्स होण्यासाठी 11 महिने लागले आणि नंतर 1,00,000 पर्यंत जाण्यासाठी दोन महिने लागले.‘ आता निशा तिच्या र्धेीर्ढीलश ओंची मॉनिटाईझ करून, कोर्सेसद्वारे आणि विविध प्रोडक्टस् विकून, कॉर्पोरेट चर्चा आणि ब—ँडसह भागीदारी करून वर्षाला 8 कोटी रुपये कमवते. निशा शाह विविध प्रकारांचे व्हिडीओ करते, ज्याचा विविध स्तरातील लोकांना फायदा होत आहे. पैशांचं नियोजन, कोणत्या सवयी तुम्हाला गरीब ठेवतात, गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी, पर्यायी उत्पन्न अशा विविध विषयांवर तिने केलेले व्हिडीओ गाजले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT