South Africa diamonds | दक्षिण आफ्रिकेतील हिर्‍यांमध्ये निकेल-समृद्ध धातूचे पुरावे File Photo
विश्वसंचार

South Africa diamonds | दक्षिण आफ्रिकेतील हिर्‍यांमध्ये निकेल-समृद्ध धातूचे पुरावे

पुढारी वृत्तसेवा

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेतील वूरस्पेड खाणीतून मिळालेल्या हिर्‍यांमध्ये पृथ्वीच्या प्रावरणाचे (मँटल) एक मोठे रहस्य उलगडणारे पहिले नैसर्गिक पुरावे सापडले आहेत. या हिर्‍यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, निकेल-समृद्ध धातूचे मिश्रण पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली सुमारे 280 ते 470 किलोमीटर (174-292 मैल) खोलीवर नैसर्गिकरीत्या तयार होतात.

हिब्रू विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ अर्थ सायन्सेसमधील येअल केंपे आणि याकोव्ह वाईस यांच्या नेतृत्वाखालील एका नवीन अभ्यासातून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. दशकांपासून, भूगर्भशास्त्रज्ञांनी मॉडेल्स आणि उच्च-दाब प्रयोगांद्वारे असे भाकीत केले होते की, पृथ्वीच्या प्रावरणामध्ये सुमारे 250 ते 300 किलोमीटर खोलीवर निकेल-समृद्ध धातूचे मिश्रण स्थिर असावेत. मात्र, नैसर्गिक नमुन्यांमध्ये याची पुष्टी करणे अत्यंत दुर्मीळ होते. या नवीन संशोधनात, वाईस यांच्या टीमने 280 ते 470 किलोमीटर खोलीवर तयार झालेल्या हिर्‍यांमध्ये, निकेल-लोह धातूचे नॅनो-अंतर्भाव आणि निकेल-समृद्ध कार्बोनेट मायक्रो-अंतर्भाव ओळखले आहेत.

हे प्रावरण रेडॉक्स मॉडेलच्या दीर्घकाळापासून अपेक्षित असलेल्या निकेल-समृद्ध मिश्रणाची उपस्थिती सिद्ध करणारे पहिले थेट नैसर्गिक पुरावे आहेत. या अभ्यासानुसार, हिर्‍यांमध्ये आढळलेले हे निकेल-समृद्ध धातूचे मिश्रण आणि निकेल-समृद्ध कार्बोनेट घटक एकत्र आढळतात. हे दोन्ही घटक एका दुर्मीळ ‘रेडॉक्स-फ्रीझिंग’ अभिक्रियेचे (reaction) चित्रण करतात. या अभिक्रियेत, ऑक्सिडाईझ्ड वितळलेले पदार्थ कमी झालेल्या प्रावरण खडकात प्रवेश करतात. हिरा वाढत असताना त्याने या अभिक्रियेतील दोन्ही अभिक्रियाकारक (reactants) आणि उत्पादने (products) आपल्यात अडकवून ठेवली.

हे निष्कर्ष केवळ प्रावरणाच्या रेडॉक्स अवस्थेबद्दलच्या (रासायनिक घटकांचे ऑक्सिडाईझ्ड आणि कमी झालेले संतुलन) भाकितांना पुष्टी देत नाहीत, तर हे देखील स्पष्ट करतात की, अशा प्रक्रिया शेकडो किलोमीटर खोलवरून उद्रेक करणार्‍या अस्थिर-समृद्ध मॅग्माला (volatile- rich magmas) कशी ऊर्जा देतात आणि हिर्‍याला पृष्ठभागावर आणण्यास मदत करतात. या हिर्‍यांच्या खनिज भारामध्ये कोइसाईट, पोटॅशियम-समृद्ध अ‍ॅल्युमिनस घटक आणि रेणू-स्वरूपातील नायट्रोजनचे अंतर्भावदेखील सापडले आहेत. या अतिरिक्त पुराव्यांमुळे या हिर्‍यांची उत्पत्ती प्रावरणाच्या वरच्या भागातून आणि संक्रमण क्षेत्रातून झाली, याची खात्री मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT