पुढील महामारी बर्फाच्या गुहेतून येणार? 
विश्वसंचार

Ice cave Bacteria: पुढील महामारी बर्फाच्या गुहेतून येणार?, 5 हजार वर्षांपूर्वीचा जीवाणू 10 आधुनिक औषधांनाही दाद देईना

Romania’s largest ice caves: रोमानियातील ‌‘स्कारिसोआरा‌’ बर्फाच्या गुहेत 5,000 वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेला एक अतिशय घातक जीवाणू

पुढारी वृत्तसेवा

बुखारेस्ट : जगाला ग्रासणारी पुढील महामारी एखाद्या प्राचीन भूमिगत बर्फाच्या गुहेतून येऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. रोमानियन अकादमीच्या संशोधकांनी रोमानियातील ‌‘स्कारिसोआरा‌’ बर्फाच्या गुहेत 5,000 वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत असलेला एक अतिशय घातक जीवाणू शोधून काढला आहे.

संशोधकांनी या गुहेतून जीवाणूचा नमुना अत्यंत सावधगिरीने बाहेर काढला आणि त्याची 10 सामान्य प्रतिजैविकांविरुद्ध चाचणी केली. यामध्ये क्षयरोग, कोलायटिस आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावर वापरल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश होता. हा जीवाणू 5,000 वर्षे जुना असूनही, त्याने सर्व 10 प्रकारच्या आधुनिक औषधांना प्रतिकार केला आहे. म्हणजेच, ही औषधे या जीवाणूला नष्ट करण्यास असमर्थ ठरली आहेत.

संशोधक डॉ. क्रिस्टिना पुर्कारिया यांनी सांगितले की, ‌‘सायक्रोबॅक्टर SC65 A.3' (Psychrobacter SC65 A.3) नावाच्या या जीवाणूमध्ये 100 पेक्षा जास्त औषध-प्रतिरोधक जनुके (Resistance genes) आढळली आहेत. वाढत्या जागतिक तापमानामुळे बर्फ वितळत आहे. जर हा बर्फ वितळला आणि हे सूक्ष्मजीव बाहेर आले, तर हे प्रतिरोधक जनुक आधुनिक जीवाणूंमध्ये पसरू शकतात. यामुळे जगासमोर प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या ‌‘सुपरबग्स‌’चे (Antibiotic Resistance) मोठे संकट उभे राहू शकते.

शास्त्रज्ञांनी स्कारिसोआरा गुहेतील ‌‘ग्रोस हॉल‌’ नावाच्या भागातून 25 मीटर खोल बर्फाचा तुकडा बाहेर काढला. हा बर्फाचा तुकडा सुमारे 13,000 वर्षांच्या कालखंडाचे प्रतिनिधित्व करतो. दूषित होण्यापासून वाचवण्यासाठी हे नमुने निर्जंतुक पिशव्यांमध्ये प्रयोगशाळेत नेले गेले. तिथे त्यांच्या जनुकांचा (Genome sequencing) अभ्यास करण्यात आला.

‌‘सायक्रोबॅक्टर‌’ कुटुंबातील जीवाणू मानवांमध्ये आणि प्राण्यांमध्ये संसर्ग पसरवण्यासाठी आधीच ओळखले जातात. या नव्या जीवाणूची तीव्रता तपासण्यासाठी संशोधकांनी त्याला मानवांना दिली जाणारी 28 प्रकारची प्रतिजैविके लावून पाहिली. शास्त्रज्ञांच्या मते, जर हे प्राचीन जीवाणू नैसर्गिक वातावरणात पुन्हा सक्रिय झाले, तर ते मानवी आरोग्यासाठी मोठी आपत्ती ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT