...तर अकरा हजार वर्षांनी सुरू होईल नवे हिमयुग Pudhari File Photo
विश्वसंचार

...तर अकरा हजार वर्षांनी सुरू होईल नवे हिमयुग

पुढारी वृत्तसेवा

लंडन : पृथ्वीच्या सूर्याच्या सापेक्ष असलेल्या कलण्यातील बदलांनी गेल्या 8 लाख वर्षांमध्ये महाकाय हिमपत्रांचे (आईस शिटस्) हालचाली नियंत्रित केल्या असून, आठ हिमयुगांच्या सुरुवात आणि शेवटाला ते कारणीभूत ठरले असल्याचे नवीन संशोधन सूचित करते. या अभ्यासातून पृथ्वीचे झुकणे आणि हिमपत्रनिर्मितीमध्ये ‘आश्चर्यकारक संबंध’ असल्याचे उघड झाले आहे, असे या संशोधनाचे प्रमुख लेखक स्टीफन बार्कर म्हणाले. या निष्कर्षांवर आधारित संशोधकांनी अंदाज व्यक्त केला की, जर मानवनिर्मित जागतिक तापमानवाढीने अडथळा आणला नसता, तर पुढील दहा ते अकरा हजार वर्षांत नवीन हिमयुग सुरू झाले असते. जर असा अडथळा आला नाही, तर नवे हिमयुग सुरू होऊ शकते.

ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठातील प्राध्यापक बार्कर यांनी सांगितले की, पुढील 10,000 वर्षांत नवीन हिमयुग सुरू होईल. मात्र, या अंदाजात मानवी क्रियाकलापांमुळे झपाट्याने वाढत असलेल्या हरितगृह वायू उत्सर्जनाचा विचार केलेला नाही. हे वायू पृथ्वीला इतके गरम करत आहेत की, पुढील हिमयुग रोखलेही जाऊ शकते! हिमयुग किंवा ग्लेशियल कालखंड हे अतिशय थंड काळ असतात, जे सुमारे प्रत्येक 1,00,000 वर्षांनी होतात आणि हजारो वर्षे प्रचंड हिमपत्रांनी पृथ्वी व्यापलेली असते. हे हिमयुग ‘मधल्या उष्ण कालखंडां’ ने वेगळे होतात, ज्या काळात हिमपत्र वितळून ध्रुवांकडे परत जातात. सध्या पृथ्वी इंटरग्लेशियल कालखंडात आहे आणि शेवटचा हिमयुगाचा कळस 20,000 वर्षांपूर्वी होता. शास्त्रज्ञांनी यापूर्वीच असे सुचवले होते की, पृथ्वीची सूर्याची सापेक्ष स्थिती आणि झुकणे हे हिमपत्रनिर्मितीवर परिणाम करतात. 1920 च्या दशकात, सबिर्र्यन शाास्त्रज्ञ मिलुटिन मिलान्कोव्हिच यांनी असा सिद्धांत मांडला की, पृथ्वीच्या अक्षीय कलण्यातील आणि कक्षीय आकारातील किरकोळ बदल हिमयुगांना कारणीभूत ठरू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT