विश्वसंचार

केक आहे की एटीएम मशिन?

Pudhari News

न्यूयॉर्क :

केकमध्येही हल्‍ली भन्‍नाट प्रकार केले जातात. हे केवळ त्यांच्या रंग-रूपाबाबतच असते असे नाही. अशाच एका 'हट के' केकचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका 'बर्थ डे बॉय'ला आपल्या केकमध्ये चक्‍क नोटांची गुंडाळी मिळाली आणि तो अक्षरशः नाचू लागला!

केकवर 'हॅपी बर्थ डे' किंवा एखाद्या माणसाचे नाव असलेली कलाकृती खोचलेली असते. अशाच वस्तूला प्लास्टिकच्या आवरणाखाली असलेल्या नोटांची गुंडाळी जोडलेली होती. या माणसाने ही वस्तू उचलताच आतून या नोटा बाहेर येऊ लागल्या आणि तो नाचू लागला. या नोटा इतक्या होत्या की हा केक आहे की एटीएम मशिन असा एखाद्याला प्रश्‍न पडावा! ज्या ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे तिच्याच वडिलांचा हा वाढदिवस होता. त्यासाठी तिने, तिची आई व बहिणीने हा खास 'सरप्राईज केक' तयार केला होता. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून या बहिणी व त्यांच्या आईच्या कल्पकतेचे कौतुकही केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT