विश्वसंचार

चंद्रावरील वावटळीवर आता नव्या संशोधनातून प्रकाशझोत

Arun Patil

वॉशिंग्टन : चंद्रावरील वावटळीबाबत संशोधकांना अद्यापही गूढ उकलता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर, नासाच्या रिकॉनिसेंट ऑर्बिटरने चंद्राच्या पटलावरील नवे संशोधन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रावरील भौतिक बदलांबाबत हे संशोधन आधारलेले आहे. चंद्रावरील वावटळ ही तेथील पृष्ठभागावर असलेल्या वेड्यावाकड्या वळणावरुन ओळखली जाते. सूर्यप्रकाशाला उच्च स्तरावर प्रतिबिंबित करत असताना ते अधिक चकाकतात. कोणत्याही वस्तू किंवा घटकाकडून अंतराळात पुन्हा प्रतिबिंबित होणार्‍या सूर्याच्या प्रकाशमात्रेला त्याचा अल्बेडो असे म्हटले जाते. चंद्रावरील या वावटळींनाही हाय अल्बेडो या नावाने ओळखले जाते. याचे संशोधन प्लॅनेटरी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

चंद्रावरील दुसर्‍या टोकाकडे प्राचीन ज्वालामुखीपासून तयार झालेल्या अनेक आकृती येथे अंधार्‍या भागात आणि उजेडातही आहेत. मात्र, ते कसे तयार झाले, यावरून तज्ज्ञांमध्ये अजूनही एकमत नाही. याशिवाय, चंद्र व अन्य ग्रहाचे पृष्ठ आसपासच्या अंतराळ वातावरणाला कसे प्रभावित करतात, यावरही संशोधन सुरू आहे.

या अनुषंगाने एक शोध लावला गेला असून यानुसार, अंधार्‍या भागातील वावटळ साधारणपणे 8 ते 9 फूट खोल असल्याचे यात म्हटले गेले आहे. उजेडाच्या जागेतील काही वावटळे अगदी 13 फुटांपर्यंतचे आहेत. आता वावटळ कसे आकारास येतात, याबद्दल आताच काही ठोस सांगता येणार नाही. मात्र, हे वावटळ तयार झाले, त्यावेळी एकाचवेळी अनेक प्रक्रिया झाल्याची शक्यता फेटाळता येत नाही.

SCROLL FOR NEXT