ड्रोन, स्मार्टफोन आणि स्वायत्त वाहनांसाठी नवी मायक्रोकोम्ब चिप 
विश्वसंचार

ड्रोन, स्मार्टफोन आणि स्वायत्त वाहनांसाठी नवी मायक्रोकोम्ब चिप

microcomb chip : कंगव्याच्या दातांसारख्या सूक्ष्म रचनांनी युक्त चिप

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : संशोधकांनी एक नवीन ‘मायक्रोकोम्ब चिप’ विकसित केली आहे, जी अवघी 5 मिलिमीटर रुंद असून, कंगव्याच्या दातांसारख्या सूक्ष्म रचनांनी युक्त आहे. ही चिप अत्यंत अचूक ऑप्टिकल अणुघड्याळांना अधिक लहान आणि व्यावहारिक बनवू शकते, ज्यामुळे ती वास्तविक वापरासाठी उपयुक्त ठरेल. या तंत्रज्ञान क्रांतीमुळे ‘जीपीएस’ प्रणालींची अचूकता हजार पट वाढू शकते. यामुळे स्मार्टफोन, ड्रोन नेव्हिगेशन तसेच भूकंपमापन आणि भूशास्त्रीय सर्वेक्षण अधिक प्रभावी होऊ शकतात, असे संशोधकांनी नमूद केले आहे.

हे संशोधन ‘नेचर फोटोनिक्स’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या अणुघड्याळांमुळे ‘जीपीएस’ प्रणाली काही मीटरच्या अचूकतेपर्यंत मर्यादित आहे. मात्र, ऑप्टिकल अणुघड्याळांचा वापर केल्यास ही अचूकता काही सेंटीमीटरपर्यंत सुधारली जाऊ शकते, असे संशोधनाचे सहलेखक आणि पर्ड्यू विद्यापीठाचे इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीचे प्राध्यापक मिंगहाओ ची यांनी स्पष्ट केले. अणुघड्याळांमुळे अत्यंत सूक्ष्म स्वरूपातील लांबी आणि अक्षांशातील बदल देखील मोजता येतो. त्यामुळे ज्वालामुखीच्या हालचाली आणि भूगर्भातील घडामोडींचे निरीक्षण करणे सोपे होणार आहे. जगभरात सध्या 400 हून अधिक उच्च-अचूकतेचे अणुघड्याळ वापरण्यात येत आहेत. ही घड्याळे क्वांटम यांत्रिकीच्या सिद्धांतांवर आधारित असून, अणूंना विशिष्ट ऊर्जा स्थितीत हालचाल करण्यास उद्युक्त करून अत्यंत अचूक वेळ मोजतात. या तंत्रज्ञानाचा उपयोग समन्वयित सार्वत्रिक वेळ (यूटीसी) आणि ‘जीपीएस’ उपग्रहांमध्ये केला जातो, ज्यामुळे स्मार्टफोन, वाहन नेव्हिगेशन आणि अन्य उपकरणांना अचूक स्थान माहिती मिळते. नवीन मायक्रोकोम्ब चिपमुळे भविष्यात या प्रणालींमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT