Cyber Attack Threat | सायबर हल्ल्याचा नवा धोका : एआय एजंटस्ना प्रतिमांद्वारे लक्ष्य Pudhari File Photo
विश्वसंचार

Cyber Attack Threat | सायबर हल्ल्याचा नवा धोका : एआय एजंटस्ना प्रतिमांद्वारे लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सायबर हल्ल्यांसाठी हॅकर्स आता नवेनवे फंडे शोधत आहेत. सध्या अनेक लोक वैयक्तिक कामांसाठी एआय एजंटस् (चॅटबॉट नव्हे) वापरत असतात. मात्र, अशा एआय एजंटस्नाच लक्ष्य बनवले जाऊ शकते. हे एआय एजंट हॅकर्सना तुमच्या संगणकात प्रवेश देऊ शकतात आणि संगणकावरील डेटा नष्ट करू शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यासाठी विविध प्रतिमांचा म्हणजेच इमेजेसचा वापर केला जाऊ शकतो.

अशा एआय एजंटबद्दल अधिक जाणून घेऊया. जर एक सामान्य चॅटबॉट (जसे की, चॅटजीपीटी) एक उत्साही मित्र असेल जो तुम्हाला टायर कसा बदलायचा हे समजावून सांगतो, तर एआय एजंट हा तो शेजारी आहे जो स्वतः जॅक घेऊन येतो आणि प्रत्यक्षात टायर बदलतो. 2025 मध्ये, हे एजंटस्, जे नियमित संगणकीय कामे पार पाडतात, एआय क्रांतीची पुढची लाट बनत आहेत. एआय एजंट आणि चॅटबॉट यांच्यातील मुख्य फरक हा आहे की, चॅटबॉट फक्त बोलतो; पण एजंट कृती करतो. तो नवीन टॅब उघडतो, फॉर्म भरतो, बटणे क्लिक करतो आणि आरक्षणे करतो.

तुमच्या संगणकावर इतका प्रवेश मिळाल्याने, आता धोक्यात केवळ चॅट विंडोमधील चुकीचे उत्तर नाही. जर एजंट हॅक झाला, तर तो तुमची डिजिटल सामग्री शेअर किंवा नष्ट करू शकतो. ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी arXiv. org वर प्रकाशित केलेल्या एका नवीन शोधनिबंधानुसार, प्रतिमा म्हणजेच डेस्कटॉप वॉलपेपर, जाहिराती, पीडीएफ आणि सोशल मीडिया पोस्ट यांमध्ये असे अद़ृश्य संदेश लपवले जाऊ शकतात जे मानवी डोळ्यांना दिसत नाहीत. परंतु, ते एजंटस्ना नियंत्रित करू शकतात आणि हॅकर्सना तुमच्या संगणकात प्रवेश देऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT