विश्वसंचार

‘नासा’ला ४२ वर्षांपूर्वीच मिळाले होते शुक्रावरील सूक्ष्म जीवांचे संकेत

Pudhari News

वॉशिंग्टन : गेल्या महिन्यात म्हणजेच 14 सप्टेंबरला संशोधकांनी 'नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी' या नियतकालिकात शुक्राबद्दल एक माहिती प्रसिद्ध केली व तिने जगाचे लक्ष वेधून घेतले. अत्यंत खडतर वातावरण असलेल्या शुक्र ग्रहावरही सूक्ष्म जीवांचे अस्तित्व असू शकते असे या संशोधकांनी म्हटले होते. त्याचे कारण म्हणजे त्यांना शुक्राच्या वातावरणात 'फॉस्फाईन' नावाच्या विषारी वायूचा छडा लागला होता. हा वायू तेथील सूक्ष्म जीवांच्या अस्तित्वाचाही परिणाम असू शकतो असे त्यांनी म्हटले होते. खरे तर 'नासा'ला 1978 मध्ये म्हणजेच 42 वर्षांपूर्वीच असे संकेत मिळाले होते; पण तिकडे दुर्लक्ष करण्यात आले असे आता समोर आले आहे.

शुक्राच्या दाट वातावरणातील वरच्या स्तरात हा 'फॉस्फाईन' वायू आढळून आला होता. आपल्या सौरमालिकेत जीवसृष्टीच्या शोधासाठी अशा वायूचे अस्तित्वही दीर्घकाळापासून गृहित धरले जात होते. विशेषतः मंगळासारखा ग्रह किंवा शनी व गुरू ग्रहांच्या काही चंद्रांवर त्याबाबतीत संशोधन केले जात असते. शुक्र हा ग्रह अत्यंत तप्त व विषारी वायूंनी भरलेला असल्याने तिथे जीवसृष्टीची शक्यता असेल असे कुणाच्या मनातही येत नव्हते. मात्र, कॅलिफोर्नियातील कॅल पॉली पोमोना येथील बायोकेमिस्ट राकेश मोगुल यांनी 'नासा'च्या जुन्या डाटाचा सखोल अभ्यास करून तेथील वातावरणात फॉस्फाईनही आहे याचा शोध घेतला. त्यासाठी त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी डिसेंबर 1978 मध्ये शुक्रावर गेलेल्या 'पायोनियर 13' यानाच्या निरीक्षण नोंदींचा आधार घेतला. याचा अर्थ गेल्या 42 वर्षांपासून ही माहिती तशीच दुर्लक्षित होती!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT