वॉशिंग्टन ः अमेरिकेच्या ‘नासा’ने आपल्या अत्याधुनिक इन्फ्रारेड अवकाश दुर्बिणीचे प्रक्षेपण केले आहे, जी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या तोडीस तोड ठरण्याची शक्यता आहे. स्पेक्ट्रो-फोटोमीटर फॉर द हिस्टरी ऑफ द युनिव्हर्स, एपोक ऑफ रिऑनायझेशन, अँड आयसेस एक्सप्लोरर (SPHEREx) ही दुर्बीण नुकतीच स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे कॅलिफोर्नियातील वँडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून अवकाशात झेपावली.
पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर, ही दुर्बीण 102 स्वतंत्र इन्फ्रारेड रंग संवेदकांचा वापर करून संपूर्ण आकाशाचे चार वेळा स्कॅनिंग करेल. दोन वर्षांच्या नियोजित मोहिमेदरम्यान, ती 450 दशलक्षहून अधिक आकाशगंगांमधील डेटाचा संग्रह करेल. या डेटाच्या आधारे वैज्ञानिकांना ब—ह्मांडाच्या निर्मितीशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यास मदत मिळेल, जसे की आकाशगंगांची निर्मिती आणि उत्क्रांती कशी झाली, पाण्याचा उगम कसा झाला आणि आपले विश्व कसे अस्तित्वात आले. ‘जेम्स वेब’च्या तुलनेने विशिष्ट प्रदेशांचा सखोल अभ्यास करत असतो, तर SPHEREx संपूर्ण अवकाशाचा व्यापक नकाशा तयार करून ‘जेम्स वेब’साठी अभ्यासयोग्य क्षेत्रे ओळखण्याचे काम करेल. नासाच्या अॅस्ट्रोफिजिक्स विभागाचे कार्यकारी संचालक शॉन डोमागल-गोल्डमन यांनी सांगितले की, ‘जेम्स वेब’सह एखाद्या व्यक्तीचा फोटो काढल्यासारखे आहे, तर SPHEREx सह संपूर्ण गट आणि त्यांच्या भोवतालच्या वातावरणाचा विस्तृत पॅनोरामा मिळतो. सुमारे 10 वर्षांच्या विकास प्रक्रियेत तयार झालेल्या आणि 488 डॉलर्स दशलक्ष खर्चाच्या या दुर्बिणीचे उद्दिष्ट दृश्यमान आणि इन्फ्रारेड प्रकाशाचे निरीक्षण करून ब—ह्मांडाचा नकाशा तयार करणे आहे. ती दिवसाला 14.5 वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल आणि आपल्या कार्यकाळात 11,000 प्रदक्षिणा पूर्ण करेल. यामध्ये स्पेक्ट्रोस्कोपी तंत्राचा वापर करून दूरस्थ गॅस आणि धुळीच्या ढगांमधून येणार्या इन्फ—ारेड प्रकाशाचा वेध घेतला जाईल.