नासाने शोधले 26 नवे विषाणू Pudhari File Photo
विश्वसंचार

नासाने शोधले 26 नवे विषाणू

हे विषाणू एलियनसारखे दिसतात

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेने सौदी अरब आणि भारतातील वैज्ञानिकांसोबत मिळून 26 नवीन विषाणू शोधले आहेत. हे विषाणू एलियनसारखे दिसतात आणि ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या स्वच्छ ठिकाणी सापडले आहेत. हे विषाणू एक्सट्रेमोफाईल्स नावाचे आहेत आणि त्यांच्यात डीएनए दुरुस्ती करण्याची क्षमता आहे, तसेच ते रेडिएशन आणि रसायनांना प्रतिरोध करू शकतात, अशी प्राथमिक माहिती यावेळी देण्यात आली आहे.

किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने (केएयूएसटी) या अभ्यासाचे नेतृत्व केले. नासा, भारत आणि सौदी अरेबियाच्या संस्थांनी यात सहकार्य केले आहे. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की हे विषाणू अंतराळ प्रवासात जिवंत राहू शकतात. भविष्यात ते जैव-उपकरण म्हणून काम करू शकतात. केएयूएसटीचे प्रोफेसर अलेक्झांडर रोसाडो यांनी सांगितले, ‘आम्ही असे जीव शोधत होतो जे अंतराळातील अत्यंत कठीण परिस्थितीत जिवंत राहू शकतील.’ प्रोफेसर अलेक्झांडर रोसाडो यांनी सांगितले की, हे विषाणू मंगळ ग्रहावर पोहोचू शकतात. ते पृथ्वीवर औषधे बनवण्यासाठी, अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी आणि विषारी कचरा साफ करण्यासाठी मदत करू शकतात.

अभ्यासाच्या पहिल्या लेखिका ज्युनिया शुल्झ यांनी सांगितले की हा शोध ग्रहांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न उभे करतो. शुल्झ यांनी सांगितले की, अंतराळ जैवतंत्रज्ञानासाठी एक नवीन स्रोत असू शकते. नासाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कस्तुरी वेंकटेश्वरन म्हणाले, ‘हे छोटे जीव भविष्यात इतर ग्रहांवर वस्ती करण्यास, रोगांवर उपचार करण्यास किंवा जीवनाच्या उत्पत्तीला समजून घेण्यास मदत करू शकतात.’ हा निष्कर्ष नासाला अंतराळ मोहिमांमध्ये विषाणूचा सामना करण्याची रणनीती बनविण्यात मदत करेल. हे स्वच्छ खोल्यांमध्ये सूक्ष्मजंतू प्रदूषण रोखण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हे विषाणू अंतराळात जीवनाच्या शक्यतांना समजून घेण्यास मदत करतील. उल्लेखनीय आहे की चीनच्या वैज्ञानिकांनी देखील अलीकडेच तियांगोंग स्पेस स्टेशनमध्ये एक नवीन आणि अज्ञात विषाणू शोधला आहे. हे विषाणू पृथ्वीवर यापूर्वी कधीही पाहिले गेले नाहीत. ते मातीमध्ये आढळणार्‍या विषाणूच्या साधर्म्य साधणारे आहेत. अशा प्रकारचे शोध पुढील अंतराळ संशोधनासाठी महत्त्वाचे असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT