विश्वसंचार

NASA space research | ‘नासा’ने टिपला चमकदार ‘सुपरनोव्हा’

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या जेम्स वेब टेलिस्कोप या अतिशय उत्तम क्षमतेच्या दुर्बिणीच्या माध्मयातून नॉर्थवेस्टर्न यूनिव्हर्सिटीतील काही संशोधकांच्या समुहाने एका तार्‍याला विनाश पावण्याआधीच्या स्फोट होतानाच्या स्थितीत अतिशय जवळून टिपलं. पहिल्यांदाच या समुहाने मध्य-अवरक्त (Mid- Infrared) प्रकाशात एका सुपरनोवाच्या स्रोताचा छडा लावला.

या संशोधनामध्ये ‘हबल’ दुर्बिणीच्या जुन्या आकडेवारीशी तुलना केल्यास समोर आलेल्या माहितीनुसार हा प्रचंड स्फोट एका अतिशय मोठ्या अशा लालबुंद दानवी तार्‍यापासून झाला. हा तारा, धुळीच्या एका जाड आणि हैराण करणार्‍या चादरीमध्ये जणू गुरफटला होता. संशोधकांना मिळालेल्या माहितीनुसार, लाल रंगाचे हे तारे स्फोट होताना अतिशय कमी का दिसतात, याची उकल होऊ शकते. सध्याची तार्‍यांची स्थिती पाहता अनेक तार्‍यांच्या स्फोटास हेच लाल रंगाचे तारे जबाबदार असल्याचं म्हटलं जातं.

नव्या संशोधनानुसार हे तारे स्फोटास कारणीभूत असले तरीही धुळीच्या थरामुळं ते नजरेस पडत नाहीत. हे निरीक्षण ‘द एस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. स्फोट झालेला हा तारा अतिशय प्रचंड प्रमाणात चकाकणारा असून, त्याला रंग गडद लाल होता. आश्चर्याची बाब म्हणजे सूर्याहून तो 1 लाख अधिक पटींनी ऊर्जा देत होते. सर्वप्रथम 29 जून डछ2025 हिीं ला या सुपरनोव्हाची माहती मिळाली. ऑल-स्काय ऑटोमेटेड सर्वेच्या मदतीनं यासंदर्भातील माहिती समोर आली.

हा स्फोट सर्पिल आकाशगंगेत झाला असून, ती पृथ्वीपासून 4 कोटी प्रकाशवर्षे दूर असून, या स्फोटानंतर आणि स्फोटापूर्वी अद्वितीय निरीक्षण करण्याची संधी संशोधकांना मिळाली. जेम्स वेब दुर्बिणीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या महाभयंकर तार्‍याचा स्फोट झाला तेव्हा त्याच्या आजुबाजूला नेमकं कसं वातावरण होतं हेसुद्धा समोर आलं आहे. या अध्ययनामध्ये अश्विन सुरेश या नॉर्थवेस्टच्या वेनबर्ग कॉलेज ऑफ आर्टस् अँड साइंसेजमधील भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र विषयातील भारतीय विद्यार्थ्याचाही समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT