‘आर्टेमिस-2‌’ने मोडला ‌‘अपोलो-13‌’चा 55 वर्षांपूर्वीचा विक्रम 
विश्वसंचार

Artemis II mission : ‘आर्टेमिस-2‌’ने मोडला ‌‘अपोलो-13‌’चा 55 वर्षांपूर्वीचा विक्रम

मानवी अंतराळ मोहिमेत गाठले सर्वाधिक अंतर

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : नासाच्या ‌‘आर्टेमिस-2‌’ मोहिमेने पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. पृथ्वीपासून मानवाचा आजवरचा सर्वात लांबचा प्रवास करण्याचा विक्रम या मोहिमेने प्रस्थापित केला आहे. यापूर्वी 1970 मध्ये ‌‘अपोलो-13‌’ मोहिमेने पृथ्वीपासून 2,48,655 मैल (4,00,171 किलोमीटर) अंतरावर जाण्याचा विक्रम केला होता, जो आता ‌‘आर्टेमिस-2‌’ने मोडीत काढला. आता या यानाचा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झालाआहे.

भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री (6 एप्रिल) ‌‘इंटिग््रािटी‌’ या ओरियन कॅप्सूलने चंद्राच्या दुसऱ्या बाजूने प्रवास सुरू केला आणि जुना विक्रम मागे टाकला. नासाच्या माहितीनुसार, चंद्राभोवतीच्या सहा तासांच्या या प्रवासात हे यान पृथ्वीपासून तब्बल 2,52,760 मैल (4,06,777 किलोमीटर) अंतरावर पोहोचेल. हे अंतर ‌‘अपोलो-13‌’च्या विक्रमापेक्षा साधारण 4,100 मैलांनी जास्त आहे. कॅनेडियन स्पेस एजन्सीच्या अंतराळवीर जेनी गिबन्स यांनी या ऐतिहासिक क्षणी अंतराळवीरांशी संवाद साधताना म्हटले, ‌‘15 एप्रिल 1970 रोजी ‌‘अपोलो-13‌’च्या तीन अंतराळवीरांनी मानवाच्या पृथ्वीपासूनच्या सर्वात लांबच्या प्रवासाचा विक्रम केला होता. आज 55 वर्षांनंतर, तुम्ही सर्व मानवजातीसाठी ती सीमा ओलांडून पुढे जात आहात. ‌‘हा विक्रम प्रस्थापित केल्यानंतर एक अत्यंत भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. मोहिमेचे कमांडर रीड वाईजमन यांनी चंद्राच्या सीमेवर दिसणाऱ्या एका तेजस्वी विवराला त्यांच्या दिवंगत पत्नीचे नाव देण्याची विनंती केली. वाईजमन यांचा आवाज गहिवरला होता. ते म्हणाले, ‌‘आम्ही आमच्या प्रिय व्यक्तीला, कॅरोलला गमावले आहे. ते चंद्रावरचे एक तेजस्वी ठिकाण आहे. आम्हाला त्याला ‌‘कॅरोल‌’ म्हणायला आवडेल. यासोबतच अंतराळवीरांनी दुसऱ्या एका विवराला आपल्या यानाचे नाव म्हणजेच ‌‘इंटिग््रािटी‌’ देण्याची विनंती केली, जी मिशन कंट्रोलने मान्य केली. ओरियन अंतराळ यान चंद्रावरून जात असताना त्याचा वेग ताशी सुमारे 3,139 मैल इतका आहे. या मोहिमेत चार अंतराळवीर - रीड वाईजमन, क्रिस्टिना कोच, व्हिक्टर ग्लोव्हर आणि जेरेमी हॅन्सन - चंद्राच्या पृष्ठभागावरील सुमारे 30 वैज्ञानिक लक्ष्यांचे फोटो काढत आहेत. यात विशाल ‌‘ओरिएंटेल बेसिन‌’ आणि चंद्राच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या ‌‘हट्‌‍र्झस्प्रंग‌’ विवराचा समावेश आहे. अंतराळवीर व्हिक्टर ग्लोव्हर यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले, ‌‘केवळ उघड्या डोळ्यांनी जे काही दिसत आहे, ते पाहून मी थक्क झालो आहे.‌’

पुढील टप्पा

‌‘आर्टेमिस-2‌’ मोहिमेत अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागाचे अत्यंत जवळून आणि वेगळ्या कोनातून दर्शन घडणार आहे. या प्रवासादरम्यान अंतराळवीर ‌‘अर्थसेट‌’ (Earthset - पृथ्वी मावळणे) आणि ‌‘अर्थराईज‌’ (Earthrise -पृथ्वी उगवणे) यांसारखी विलोभनीय दृश्ये कॅमेऱ्यात कैद करतील, जे या मोहिमेचे सर्वात आकर्षक पैलू मानले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT