AI development | ‘एआय’ आता ‘एजीआय’च्या प्रारंभिक टप्प्यात : नाडेला 
विश्वसंचार

AI development | ‘एआय’ आता ‘एजीआय’च्या प्रारंभिक टप्प्यात : नाडेला

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क ः सध्याचे ‘एआय’ हे ’आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स’ (एएनआय) म्हणजेच मानवी बुद्धिमत्तेपेक्षा कमी दर्जाचे आहे. भविष्यात ते ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय) म्हणजेच मानवी बुद्धिमत्तेच्या तोडीचे होऊ शकेल असे अनेकांना वाटते. त्याहीपेक्षा पुढे जाऊन ते ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’ (एएसआय) म्हणजे मानवी बुद्धिमत्तेपेक्षा सरस होईल, असेही काहींना वाटते. आता जागतिक स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढत असताना, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (एजीआय) बद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. द्वारकेश पटेल आणि ‘सेमीअ‍ॅनालिसिस’ चे संस्थापक डायलन पटेल यांच्यासोबतच्या एका मुलाखतीत नाडेला यांनी ‘एजीआय’च्या प्रारंभिक टप्प्यात असल्याचे मान्य केले आणि भविष्याबद्दल आपला उत्साह व्यक्त केला.

नाडेला म्हणाले, ‘ही कदाचित औद्योगिक क्रांतीनंतरची सर्वात मोठी गोष्ट असू शकते,’ आणि या उत्साहातूनच त्यांनी आपल्या संभाषणाला सुरुवात केली. त्यांचे मत आहे की, ‘आम्ही काही खूप उपयुक्त गोष्टी बनवल्या आहेत आणि मला आशा आहे की हा बदल अत्यंत परिवर्तनकारी ठरेल.’ आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स (एजीआय) हा असा एआय आहे जो कोणत्याही बौद्धिक कार्याला अगदी माणसाप्रमाणेच स्वतः समजून, शिकून पूर्ण करू शकतो. यामध्ये पुढील क्षमतांचा समावेश असतो: कॉमन सेन्स (सामान्य ज्ञान), तर्कशक्ती ( Reasoning) आणि निर्णय घेण्याची क्षमता ( Decision Making). ही वैशिष्ट्ये ‘एजीआय’ला सध्याच्या केवळ विशिष्ट कार्यांसाठी (उदा. भाषा, इमेज, कोडिंग) असलेल्या एआयपेक्षा वेगळे ठरवतात.

एजीआयमध्ये प्रत्येक प्रकारचे कार्य करण्याची क्षमता असते आणि ते अनुभवाने शिकणार्‍या माणसाप्रमाणे काळानुसार स्वतःला सुधारत राहते. एजीआयमुळे आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि संशोधन अशा क्षेत्रांमध्ये मोठे बदल होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे जगाचा संपूर्ण ढाचा बदलू शकतो. नाडेला यांच्या मते, खरा प्रश्न एजीआयची माणसांसाठी उपयुक्तता हा आहे. म्हणजेच, एजीआय माणसांसाठी कोणती कामे करू शकेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, जर एजीआय योग्य प्रकारे विकसित झाले, तर ते माणसांची विचार करण्याची आणि कार्य करण्याची क्षमता वाढवणारे एक शक्तिशाली साधन बनू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT