विश्वसंचार

चकाकत्या सोनेरी जीवाश्माचे उलगडले गूढ

Arun Patil

बर्लिन : 'पायराईट' नावाचे एक चकाकते खनिज असते. त्याला 'फूल्स गोल्ड' म्हणजे 'मुर्खांचे सोने' असेही म्हटले जाते. या खनिजामुळेच काही जीवाश्म सोन्यासारखे चकाकत असतात. त्याच्या चकाकण्यामागे अन्यही काही वेगळे कारण आहे असे संशोधकांना आता वाटते.

जर्मनीच्या पोसिडोनिया शेलमधील अशा जीवाश्मावर नवे संशोधन करण्यात आले. हे ठिकाण ज्युरासिक काळाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील आहे. तिथे सागरी प्राण्यांचे अतिशय चांगल्या रितीने जतन झालेले अनेक जीवाश्म आढळून आलेले आहेत. त्यासाठी हे ठिकाण प्रसिद्धच आहे. याठिकाणी जीवाश्मभूत अ‍ॅमोनाईटस्, बायव्हाल्वज आणि क्रुस्टासीन्सचे अनेक नमुने सापडलेले आहेत. ते हाताच्या पंज्याच्या आकाराचे किंवा त्यापेक्षा थोडे मोठे होते.

संशोधकांच्या टीमने अशाच 183 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या जीवाश्माचे हाय-पॉवर्ड स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने निरीक्षण केले. मात्र, त्यांना काळ्या कवचातून बाहेर डोकावणार्‍या एखाद्या सोनेरी जीवाला शोधण्यासाठी झगडावे लागले. अर्थ-सायन्स रिव्ह्यूज या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. रोवन मार्टिनडेल या संशोधकाने सांगितले की पॅसोडोनिया शेलमधील सर्वकाही असे चमकदारच असल्याचे मानले जात होते. मात्र, तेथील नमुन्यांपैकी काहीच नमुन्यांमध्ये तसे आढळले. वास्तवात हे सर्व फॉस्फेटाईज्ड किंवा यलो कॅल्साईट आहेत. अशा यलो कॅल्साईटसह असलेल्या फॉस्फेट खनिजामुळेच त्यांना सोनेरी लकाकी येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT