विश्वसंचार

ऑस्ट्रेलियात आढळला रहस्यमय जीव!

Arun Patil

डार्विन : ऑस्ट्रेलियन शहर डार्विननजीक डंडी बीचवर एक रहस्यमय समुद्री जीव आढळून आला आहे. हा समुद्री जीव चमकत्या निळ्या व पांढर्‍या रंगाचा, तसेच आकाराने गोल आहे. त्याच्या सर्व बाजूंनी केस धाग्यासारखे पसरले आहेत आणि यामुळे त्याची तुलना डिस्को बॉलशी केली जात आहे. लोकांनी समुद्र तटावर हा जीव पाहिल्यानंतर त्यावर आश्चर्य व्यक्त करणे साहजिकच होते.

एलियनसारख्या दिसणार्‍या या जीवाला ज्या व्यक्तीने सर्वप्रथम पाहिले, तो तेथे फेरफटका मारण्यासाठी आला होता. त्याची नजर त्या प्राण्यावर पडली आणि त्याने आसपासच्या लोकांनाही तो जीव दाखवला. सोशल मीडियावर याचे छायाचित्र पोस्ट केले गेल्यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया येणे साहजिकच होते.

काहींनी या जीवावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचे सांगत ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कमाल असू शकते, असे म्हटले तर काहींनी याला स्पर्श करण्याचा धोका आपण स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले. आणखी एक यूझर म्हणाला, 'जर मी ऑस्ट्रेलियात असतो आणि मला असे काही दिसले असते तर मी तत्काळ त्या समुद्रकिनार्‍यापासून दूर गेलो असतो'.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT