विश्वसंचार

आता करिनावर भडकली कंगना | पुढारी

Pudhari News

मुंबई :

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटिझम म्हणजेच घराणेशाहीच्या विषयावर कंगना रणौतने आपल्या शस्त्रांची धार तीक्ष्ण केली आहे. आता तिच्या टीमच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून करिना कपूर खानला फैलावर घेण्यात आले आहे. करिनाच्या एका वक्‍तव्याबाबत तिच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 

करिनाने एका मुलाखतीत म्हटले होते की कुणी केवळ नेपोटिझमच्या आधारे दोन दशके इंडस्ट्रीत टिकू शकत नाही. शिवाय असेही स्टार किडस् आहेत जे यशस्वी होऊ शकले नाहीत. करिनाच्या या वक्‍तव्यावर कंगनाने अनेक प्रश्‍न विचारले. आपल्या 'बेस्ट फ्रेंड'ने कंगनाला इंडस्ट्री सोडण्यास का सांगितले होते? बड्या प्रॉडक्शन हाऊसेसनी सुशांतला बॅन का केले होते? कंगनाला 'विच' (चेटकीण) आणि सुशांतला 'दुष्कर्मी' का म्हटले गेले? तुमच्या ईको सिस्टीममध्ये कंगना आणि सुशांतला 'बायपोलर' का म्हटले जाते? असे अनेक प्रश्‍न ट्विट करून कंगनाने विचारले आहेत. सर्व 'नेपो किडस्'ना आम्ही हे सांगू इच्छितो की तुमच्या सुख-सुविधांबाबत आम्हाला काही अडचण नाही; पण ज्याप्रकारे तुम्ही आमच्याशी वागता त्यावर आमचा आक्षेप आहे असेही तिने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT