तेराव्या वर्षी सुरू केले यूट्यूब चॅनेल, बनला सर्वात श्रीमंत यूट्यूबर Pudhari File Photo
विश्वसंचार

तेराव्या वर्षी सुरू केले यूट्यूब चॅनेल, बनला सर्वात श्रीमंत यूट्यूबर

MrBeast : तो जगातील आठवा सर्वात तरुण अब्जाधीश झाला आहे

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : सध्या या यूट्यूब आणि ऑनलाईन क्रिएशनच्या जगात सगळ्यात टॉपला कोणी आहे तर तो ‘मिस्टर बीस्ट’ आहे. ‘MrBeast’ अर्थातच जिमी डोनाल्डसन हा अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना येथे राहणारा एक तरुण आहे. त्यानं लहान असतानाच ‘MrBeast’ नावानं एक यूट्यूब चॅनेल सुरू केलं आणि आज तो अब्जाधीश झाला आहे. त्याच्या नेटवर्थची नेहमीच चर्चा करण्यात येते. ‘Celebrity Net Worth’ नुसार, त्याची एकूण संपत्तीही आता एक अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. अशा प्रकारे तो जगातील आठवा सर्वात तरुण अब्जाधीश झाला आहे. तर तो एकमेव असा तरुण आहे, जो वयाच्या 30 व्या वर्षीच इतक्या संपत्तीचा मालक झाला आहे.

MrBeast नं 13 व्या वर्षी ‘MrBeast 6000’ नावानं एक यूट्यूब चॅनेल सुरू केलं. सुरुवातीला त्यानं गेमिंग व्हिडीओ रिअ‍ॅक्शन आणि युट्यूबरची संपत्ती किती असते अशी माहिती देणारा एक व्हिडीओ बनवला होता. 2017 मधील त्याचा ‘I Counted to 100000’ हा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ शूट करायला त्याला 44 तास लागले. तेव्हा त्याला झालेले चॅलेंजेस आणि गिव्हअवे स्टाईलच्या व्हिडीओमुळे त्यांना एक ओळख मिळाली. 2023 मध्ये त्यानं 223 मिलियन डॉलरची कमाई केली आणि 2024 मध्ये त्यानं 700 मिलियन डॉलरपर्यंतची कमाई केल्याचे म्हटले जाते. त्याच्या बिझनेस व्हेंचर्सबद्दल बोलायचं झालं तर MrBeast Burger : एक व्हर्च्युअल फास्ट फूड चेन आहे, ज्याची कमाई ही 2.3 मिलियन डॉलर महिना होती. त्याशिवाय त्याची Feastables नावाची चॉकलेट कंपनी आहे.

या कंपनी लाँचच्या काही महिन्यात 10 मिलियन डॉलरपेक्षा जास्त विक्री केली. नवीन क्रिएटर्सना पाठिंबा देण्यासाठी Juice Funds नावानं तो त्यांना फंड देतो. त्यानं आजवर 2 मिलियन डॉलरची मदत केली आहे. त्याशिवाय त्यानं क्रिप्टो आणि NFT मध्ये देखील गुंतवणूक केल्याचं म्हटलं जातं आणि त्याशिवाय Coinbase नावाच्या कंपन्यांशी तो जोडलेला आहे. MrBeast फक्त मनोरंजन करण्यापर्यंत मर्यादित नाही; तर त्यानं Beast Philanthropy नावानं एक एनजीओ सुरू केला असून त्याच्या मदतीनं त्यानं 100 पेक्षा जास्त गाड्या दान केल्या आहेत.

Team Trees च्या मदतीनं त्यानं 2 कोटी झाडं लावल्याचं अभियान चालवलं. 2023 मध्ये त्यानं 1000 लोकांच्या डोळ्यांची मोफत सर्जरी करून दिली. त्यामुळे त्याला अनेकांनी ट्रोलदेखील केलं. पण त्यानं पुढे म्हटलं की, ‘मरण्याच्या आधी मी माझी संपूर्ण संपत्ती ही दान करणार आहे.’ MrBeast चं यूट्यूब चॅनेलविषयी बोलायचं झालं तर ते जगातील सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारं चॅनेल आहे. त्यानं त्याच्या व्हिडीओला स्पॅनिश, फ्रेंच, अरबी सारख्या 10 भाषांमध्ये डब करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याची लोकप्रियता ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT