विश्वसंचार

तीन व सात वर्षांच्या मुलांचे गिर्यारोहण!

Pudhari News

जिनिव्हा : तीन वर्षांची मुलं आपल्या आई-वडिलांचा हात धरून न अडखळता नीट चालली तरी आपल्याला पुरेसे असते. अशा स्थितीत डोळ्यांवर चष्मा असलेला तीन वर्षांचा एक मुलगा तब्बल दहा हजार फूट उंचीचा पर्वत चढून जाईल याची आपण कल्पना करणार नाही. स्वित्झर्लंडमध्ये तीन वर्षांचा एक मुलगा व त्याची सात वर्षांची बहीण यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे.

जॅक्सन होल्डिंग असे या मुलाचे नाव असून त्याने आपली बहीण फ—ेया व आई-वडिलांसह हे गिर्यारोहण केले. स्वित्झर्लंड आणि इटलीच्या सीमेवर असलेल्या पिझ बॅडिली नावाच्या पर्वतावर या कुटुंबाने गिर्यारोहण केले. हा पर्वत गिर्यारोहणासाठी धोकादायक मानला जातो हे विशेष. 2004 मध्ये ज्युल्स कार्टराईट व ज्युली कोल्वर या दोन गिर्यारोहकांचा याच पर्वतावरून कोसळून मृत्यू झाला. अशावेळी हे कुटुंब लहानग्या मुलांसह याठिकाणी कसे गेले असतील याची कल्पनाच केलेली बरी! अर्थातच जॅक्सनने गिर्यारोहणावेळी आपल्या आईचाच आधार घेतला होता. फ—ेया मात्र एक कुशल गिर्यारोहक असून तिने स्वतःच्या हिंमतीनेच हे गिर्यारोहण केले. हे करीत असताना मजा वाटली आणि थोडी भीतीही होती असे तिने नंतर सांगितले. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT