भारतातील सर्वाधिक चुकीचे उच्चारले जाणारे इंग्रजी शब्द 
विश्वसंचार

भारतातील सर्वाधिक चुकीचे उच्चारले जाणारे इंग्रजी शब्द

पुढारी वृत्तसेवा

अमेरिकेनंतर भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा इंग्रजी बोलणारा देश आहे. तरीही, भारतात असे अनेक शब्दांचे सर्रास चुकीचे उच्चार केले जातात. 2025 मध्ये काही सुप्रसिद्ध शब्दांचा उच्चार नेमका कसा असावा, हे शोधण्यासाठी लोक सतत ऑनलाईन सर्च करत होते. क्रोसा किंवा गिबलीसारखे इतर भाषांतून आलेले शब्द गोंधळ निर्माण करू शकतात. याशिवाय, अमेरिकन आणि ब्रिटिश हेलमुळे ही गुंतागुंत अधिक वाढते. खाली 1 जानेवारी 2025 ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीतील गुगल सर्च ट्रेंडच्या डेटावर आधारित, भारतातील सर्वाधिक चुकीचे उच्चारल्या जाणार्‍या टॉप 10 शब्दांची यादी दिली आहे :

Croissant (2,06,400 सर्च)

क्रोसाँ हा एक फ्रेंच पेस्ट्रीचा प्रकार आहे. अनेक जण याचा उच्चार क्रॉय-सँट (kroy-sant) करतात, परंतु योग्य उच्चार क्र्वा-साँ (krwa-son) असा आहे, ज्यामध्ये शेवटीचा उच्चार केला जात नाही.

Ghibli (1,24,800 सर्च)

स्टुडिओ गिबली सध्या चॅट जीपीटीमधील एआय ट्रेंडमुळे चर्चेत आहे. याचा उच्चार अनेकदा “जिब-ली” केला जातो; पण योग्य उच्चार “गि-बली” (gib-lee)) असा आहे, ज्यात ग चा उच्चार स्पष्ट होतो.

Schedule (1,12,800 सर्च)

भारतीय लोक सहसा याचा उच्चार “शेड-युल” (shed-yool) करतात. ब्रिटिश इंग्रजीनुसार शेड-युल योग्य आहे, तर अमेरिकन इंग्रजीनुसार ‘स्के-जुल” असा उच्चार केला जातो.

Dachshund (88,800 सर्च)

ही कुत्र्यांची एक प्रजाती आहे आणि याचा उच्चार चुकीच्या पद्धतीने डॅश-हाऊंड केला जातो. याचा योग्य उच्चार डॅक्स-हंड (daks-hund) असा आहे.

Accent (94,800 सर्च)

अ‍ॅक्सेंट म्हणजे शब्दांच्या उच्चाराची विशिष्ट पद्धत. अनेक जण चुकीच्या अक्षरावर जोर देतात. याचा योग्य उच्चार अ‍ॅक-सेंट (ak-sent)) असा आहे, अ‍ॅक्स-सेंट नाही.

Poem (92,000 सर्च)

याचा उच्चार अनेकदा पॉय-एम” असा केला जातो; परंतु योग्य उच्चार पो-एम (po-em)) असा आहे, ज्यामध्ये दोन स्पष्ट स्वर आहेत.

Women (91,200 सर्च)

हा अतिशय सामान्य शब्द असूनही लोक woman (एकवचन) आणि woman (अनेकवचन) मध्ये गोंधळ करतात. अनेकवचनी शब्दाचा योग्य उच्चार वि-मिन (wi-min) असा आहे, वू-मेन नाही.

Genre (86,400 सर्च)

याचा चुकीचा उच्चार सहसा जेन-री असा केला जातो. याचा योग्य उच्चार झॉन-र (zhon-ruh) असा आहे.

Audio (84,200 सर्च)

अनेक जण याला ऑ-डि-यो म्हणतात. याचा योग्य उच्चार ऑ-डी-ओ असा आहे.

Water (84,000 सर्च)

सहसा याचा उच्चार वा-टर असा केला जातो. अधिक स्पष्ट उच्चार वॉ-टर (waw-ter) असा होतो, जो तुमच्या लहेजावर (accent)) अवलंबून असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT