विश्वसंचार

जगातील सर्वात महागडे विमान तिकीट

Arun Patil

दुबई : सर्वात आरामदायक व वेगवान प्रवास म्हणजे विमान प्रवास. अर्थातच त्यासाठी खर्चही तितकाच करावा लागत असतो. विमान तिकिटाचे शुल्क पाच हजारांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, एक फ्लाईट अशी आहे जी जगातील सर्वात महागडी फ्लाईट मानली जाते. या विमानाच्या तिकिटासाठी इतके पैसे मोजावे लागतात की तितक्या पैशांमध्ये बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनरसारख्या आलिशान गाड्याही आरामात खरेदी करता येतील!

जगातील सर्वात महागडे विमान तिकीट अबुधाबी ते न्यूयॉर्क या मार्गावरील एतिहाद एअरवेजच्या विमानाचे आहे. त्याचे शुल्क आहे 66 हजार डॉलर्स म्हणजे 53 लाख रुपयांपेक्षाही अधिक. एतिहाद एअरवेजचे 'एअरबस 380' हे विमान एखाद्या महालापेक्षा कमी नाही. त्यामध्ये पंचतारांकित हॉटेलसारखे आलिशान बेडरूम, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि अन्य लक्झरी सुविधा आहेत. या विमानाच्या तिकिटांचे शुल्क वीस लाख रुपयांपासून सुरू होते. कमाल शुल्क 53 लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे. अबुधाबीपासून न्यूयॉर्ककडे जाणार्‍या एतिहाद एअरवेजची फर्स्ट क्लास कॅटेगरी 'द रेसिडेन्स' ही आहे.

ती एअरबस 380 च्या वरील डेकवर 430 चौरस फूट जागेत आहे. ही जागा एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या सुईटसारखीच आहे. एमिरेटस् एअरवेजच्या लॉस एंजिल्स ते दुबई या फ्लाईटच्या तिकिटाचे शुल्क या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचे शुल्क 31 हजार डॉलर्स म्हणजेच 25 लाख रुपये आहे. या फ्लाईटमध्ये पर्सनल बेडरूमसह अन्य अनेक सुविधा आहेत. कोरियन एअरच्या फ्लाईटमध्ये न्यूयॉर्क ते सेऊलपर्यंतच्या तिकिटाचे शुल्क 28 हजार डॉलर्स म्हणजेच 23 लाख रुपये आहे. या विमानात प्रवाशांसाठी हायटेक केबिनची सोय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT