विश्वसंचार

एकच रहिवासी असलेले सर्वात सुंदर गाव!

Arun Patil

लंडन : जेथे शांतता व समृद्धी आहे, अशा ठिकाणी राहणे हे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यातही निसर्गसौंदर्य आणि अप्रतिम नजारे असतील तर खर्‍या अर्थाने ते सोन्याहून पिवळे. पण, तरीही काही अशा सुंदर जागाही अशा असतात, जेथे सारे काही असते. पण, तरीही तेथे कोणी रहायलाच तयार नसते. असेच एक निसर्गसौंदर्याची उधळण लाभलेले आणि तरीही 90 घरात केवळ एकाच मुलाचे वास्तव्य असलेले इंग्लंडमधील छोटेसे गाव म्हणजे पोर्टलो!

इंग्लंडमधील या छोट्याशा गावात तसे सारे काही आहे. समुद्राचे नितांत सुंदर किनारे, अप्रतिम निसर्गसौंदर्य, झरे, छोटया पायवाटा. सारे काही उत्तम आहे. पण, तरीही येथील 90 घरांमध्ये केवळ एकच मुलगा राहतो. आता या मुलाने देखील गाव सोडणार नाही, अशी जिद्द धरली. अन्यथा, हे पूर्ण गावच रिकामे होण्याची भीती आहे!

वास्तविक, पोर्टलो गाव आपल्या निसर्गसौंदर्यासाठी खास ओळखले जाते. येथील सूर्योदय व सूर्यास्ताचा नजारा टिपण्यासाठी अगदी दूरवरचे छायाचित्रकार येथे येत असतात. आता सारे गाव रिकामे होत असताना तेथे चोरी-दरोडे होतात की भूतमहालासारखे वातावरण आहे, असे प्रश्न निर्माण होतील, पण अशी परिस्थिती अजिबात नाही. येथे लोक न येण्याचे कारण म्हणजे येथील घरांचे गगनाला भिडणारे भाडे!

येथील स्थानिक लोक स्वत: शहरात राहण्यास जाण्यास प्राधान्य देत आले आहेत. या गावातील घर अव्वाच्या सव्वा भाड्याने द्यायचे. हा फंडा जवळपास प्रत्येकानेच अंगीकारला आहे. त्यामुळे झालेय असे की, या गावात आता एक मुलगा सोडून कोणीच रहात नाही आणि अन्य सर्व जण शहरात स्थायिक झाले आहेत.

या गावातील अगदी 2 बेडरूमचे छोटेसे कॉटेज असेल तरी त्यासाठी साडेचार कोटी रुपयांच्या घरात त्याची किंमत सांगितली जाते. तीन बेडरूमचे कॉटेज तर साडेआठ कोटींच्या घरात पोहोचते. आता ही किंमत इतकी महागडी आहे की, त्या किमतीत अगदी शहरात देखील छान घर खरेदी करता येईल. येथील गावकर्‍यांनी मात्र हट्ट सोडलेला नाही आणि यामुळे 30 आलिशान घरांचे हे गाव जवळपास रिकामेच होत आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT