Most beautiful girl | जगातील ‘सर्वात सुंदर मुलगी’ झाली 25 वर्षांची! 
विश्वसंचार

Most beautiful girl | जगातील ‘सर्वात सुंदर मुलगी’ झाली 25 वर्षांची!

सहाव्या वर्षी मिळवला होता किताब

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस : एकेकाळी ‘जगातील सर्वात सुंदर मुलगी’ म्हणून ओळखली गेलेली फ्रेंच मॉडेल थिलेन ब्लॉन्डो हिने 5 एप्रिल रोजी आपला 25 वा वाढदिवस साजरा केला. 2006 मध्ये अवघ्या 6 वर्षांची असताना ‘व्होग एन्फंटस्’ (Vogue Enfants) मासिकाने तिला हा किताब दिला होता. वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत.

थिलेनने वयाच्या 4 थ्या वर्षापासून मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिची कारकीर्द अत्यंत प्रभावशाली राहिली आहे. तिने जीन पॉल गॉल्टियर, डॉल्से अँड गॅबाना, वर्साचे आणि लोरियल यांसारख्या दिग्गज आंतरराष्ट्रीय ब्रँड्साठी मॉडेलिंग केले आहे. 2017 मध्ये ती ‘लोरियल पॅरिस’ची सर्वात तरुण ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनली. तिने झेंडायासारख्या प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्रींसोबतही काम केले आहे. 2015 मध्ये ‘बेल अँड सेबॅस्टियन: द अ‍ॅडव्हेंचर कंटिन्यूज’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. थिलेन ही फुटबॉलपटू पॅट्रिक ब्लॉन्डो आणि अभिनेत्री वेरोनिका लुब—ी यांची मुलगी आहे. तिचा जन्म फ्रान्समधील ‘एक्स-एन-प्रोव्हन्स’ येथे झाला.

लहानपणापासूनच ग्लॅमर विश्वात वावरलेल्या थिलेनने मॉडेलिंग सोबतच व्यवसायातही यश मिळवले असून, तिने स्वतःचे कपड्यांचे आणि सौंदर्यप्रसाधनांचे ब्रँड सुरू केले आहेत. 2021 मध्ये थिलेनला ‘ओव्हेरियन सिस्ट’च्या (गर्भाशयातील गाठी) समस्येचा सामना करावा लागला होता. या गुंतागुंतीमुळे तिला अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. ‘जेव्हा तुमचे शरीर दुखते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या,’ असे आवाहन तिने आपल्या चाहत्यांना केले आहे. वाढदिवसाच्या पोस्टमध्ये तिने आपल्या कुटुंबाचे, होणार्‍या पतीचे आणि चाहत्यांचे आभार मानले असून, आयुष्यात मिळालेल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT