Monkey Visits Salon | सलूनमध्ये येऊन माकडाने केले हेड, बॉडी मसाज! 
विश्वसंचार

Monkey Visits Salon | सलूनमध्ये येऊन माकडाने केले हेड, बॉडी मसाज!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : प्राण्यांना माणसांसारखे बोलता येत नसले, तरी त्यांना आपली गोष्ट कशी समजवायची हे चांगलेच ठाऊक असते. सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असलेला एका बार्बर शॉपमधील (सलून) व्हिडीओ याचाच पुरावा ठरत आहे. या व्हिडीओमध्ये सलूनच्या खुर्चीत आरामात पडून मसाज करून घेणारे एक माकड सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याने आपला असा हेड आणि बॉडी मसाज करून घेतला!

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक माकड सलूनच्या खुर्चीत मान टेकवून, अगदी शांतपणे डोळे मिटून पहुडलेले दिसत आहे आणि सलून मालक अत्यंत मन लावून त्याची मालिश करत आहे. विशेष म्हणजे, आपल्याला नक्की कुठे मसाज करून घ्यायचा आहे, हे माकड स्वतः खुणा करून सांगताना दिसत आहे. व्हिडीओच्या पार्श्वभूमीत एक आवाज येतो, ज्यात तो व्यक्ती सांगतो की, हे माकड स्वतः सांगते की त्याला कुठे मसाज हवा आहे; त्यामुळे कारागीर कधी त्याचे हात तर कधी पाय दाबून देत आहे.

माणसांना जशी मसाज दिली जाते, अगदी तशीच सेवा या माकडालाही दिली जात होती. हे अद्‌भुत दृश्य पाहण्यासाठी सलूनच्या बाहेर लोकांनी मोठी गर्दी केली होती. एकंदरीत हा व्हिडीओ अत्यंत गोंडस (क्यूट) असून, लोकांना तो खूप आवडत आहे. हा व्हिडीओ पाहणारे युझर्स मसाज करणाऱ्या व्यक्तीला नशीबवान मानत आहेत. एका युझरने कमेंट करत लिहिले, ‘हा तर सलूनचा स्पेशल गेस्ट आहे!’ तर दुसऱ्या एका युझरने या व्हिडीओला ‘व्हिडीओ ऑफ द डे’ असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT