Mongolian President Viral Video | मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सूट-बूट घालून मारले २० बेंच प्रेस 
विश्वसंचार

Mongolian President Viral Video | मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सूट-बूट घालून मारले २० बेंच प्रेस

पुढारी वृत्तसेवा

उलानबातार : सूट-बूट घातलेल्या राजकीय नेत्यांना तुम्ही सहसा भाषण देताना किंवा गंभीर बैठकांमध्येच पाहिले असेल. मात्र, मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांचा एक वेगळाच अंदाज सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. मंगोलियाचे ५८ वर्षीय राष्ट्राध्यक्ष उखनागीन खुरेलसुख यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते औपचारिक (फॉर्मल) कपड्यांमध्ये चक्क १०० किलोग्राम वजन उचलून बेंच प्रेसचे २० रॅप्स मारताना दिसत आहेत.

हा व्यायाम प्रकार मंगोलियन लष्कराच्या एका मिलिटरी युनिटच्या दौऱ्यादरम्यान घडला. सैनिक आणि अधिकाऱ्यांमध्ये पोहोचलेल्या राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख यांनी अचानक आपला कोट बाजूला ठेवला, जीम बेंचवर झोपले आणि १०० किलोचा बारबेल उचलून एकापाठोपाठ एक २० बेंच प्रेस मारले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढे वजन उचलल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याची एक रेषही दिसली नाही. वर्कआऊट पूर्ण केल्यानंतर ते उठले, सैनिकांशी हस्तांदोलन केले आणि हसत हसत पुन्हा आपला कोट परिधान केला.

राष्ट्राध्यक्षांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून (@ukhnaakhurelsukh) पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी मंगोलियन भाषेत लिहिले की, त्यांनी लष्कराच्या ०८४ व्या युनिटसोबतच्या ट्रेनिंगदरम्यान १०० किलो वजनाचे २० रॅप्स मारले. मग काय... एक्स (ट्विटर), फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT