विश्वसंचार

लाँड्रीतील जुन्या पोशाखांमध्ये वृद्ध दाम्पत्याचे मॉडेलिंग

Pudhari News

तैपेई :

सध्या तैवानमधील एका वृद्ध दाम्पत्याची चर्चा सर्वत्र आहे. 83 वर्षांचे चेंग वानजी आणि 84 वर्षांच्या सू शोर यांनी मॉडेलिंगमध्ये नाव कमावले आहे. अर्थातच ते कुणी व्यावसायिक मॉडेलिंग स्टार नाहीत. या दाम्पत्याच्या मालकीची एक लाँड्री आहे. तिथे अनेक वर्षांपूर्वी ज्या ग्राहकांनी कपडे धुण्यासाठी व इस्त्रीसाठी दिले, मात्र नंतर ते नेण्यासाठी आलेच नाहीत, असे काही कपडे त्यांच्याजवळ आहेत. असे जुने कपडे परिधान करून त्यांनी हे मॉडेलिंग केले आहे.

गेल्या महिन्यापर्यंत या दाम्पत्याचे इन्स्टाग्रामवर सहा लाख फॉलोअर्स होते. या वयातही आपला उत्साह आणि जीवनेच्छा टिकवून ठेवलेले हे दाम्पत्य अनेकांना आदर्श वाटते. तायचुंगमध्ये सेंट्रल सिटीजवळ त्यांची छोटीशी लाँड्री आहे. अनेक ग्राहकांनी गेल्या काही वर्षांच्या काळात त्यांच्याकडे आपले पोशाख दिले होते व ते नेण्यासाठी हे ग्राहक परत आलेच नाहीत. काहीजण विसरून गेले तर काही शहरातून अन्यत्र गेले. असेच कपडे परिधान करून या दाम्पत्याने फोटोशूट केले आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या 31 वर्षे वयाच्या नातवाने प्रोत्साहन दिले. लाँड्रीचे काम कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये मंदावले होते. त्यामुळे हे दाम्पत्य थोडे निराश होते. त्यांना विरंगुळा वाटावा यासाठी रीफ नावाच्या या नातवाने त्यांना असे कपडे परिधान करून मॉडेलिंग करण्यास प्रोत्साहित केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT